१०वी व १२वी परिक्षेंच्या तारखा जाहीर

Spread the love

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रसिद्धीपत्रक

पुणे ता.१५(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र) व बारावी (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.राज्यभरातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी व शैक्षणिक नियोजन सुकर व्हावे तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने या तारखा आगाऊ जाहीर करण्यात आल्या असल्याचे मंडळाने कळविले आहे.

🔹 बारावी (इ.१२ वी) परीक्षा

  • लेखी परीक्षा: मंगळवार, १० फेब्रुवारी २०२६ ते बुधवार, १८ मार्च २०२६ (माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाईन परीक्षांसह)
  • प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा: शुक्रवार, २३ जानेवारी २०२६ ते सोमवार, ९ फेब्रुवारी २०२६

🔹 दहावी (इ.१० वी) परीक्षा

  • लेखी परीक्षा: शुक्रवार, २० फेब्रुवारी २०२६ ते बुधवार, १८ मार्च २०२६
  • प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा: सोमवार, २ फेब्रुवारी २०२६ ते बुधवार, १८ फेब्रुवारी २०२६

राज्य मंडळाचे सहसचिव प्रमोद गोफणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या परीक्षांचे विषयनिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

You cannot copy content of this page