Parbhani;शेतकऱ्यांच्या तरुण मुलाने घेतली गोदापात्रात उडी

पूर्णेतील देऊळगांव (दु)येथील घटना;पालीकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी २० तासांनी शोधला मृतदेह पूर्णा, ता. १९ (प्रतिनिधी) :   सततची नापिकी, शेतीवरील कर्जाचा वाढता भार आणि वृद्ध आई-वडिलांच्या  भविष्याची चिंता यामुळे विवंचनेत असलेल्या ३१ वर्षीय शेतकरीपुत्राचा गोदावरी नदीपात्रात मृतदेह आढळून आल्याची हृदयद्रावक घटना देऊळगाव दुधाटे येथे घडली. शुक्रवारी सायंकाळी नदीपात्रात उडी घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर पूर्णा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तब्बल २० तास शोधमोहीम राबवली. अखेर तरुणाचा मृतदेह त्याच्या शेतापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर शनिवारी सकाळी आढळून आला.      बालाप्रसाद संतोष सोनवळे (वय ३१, रा. देऊळगाव दुधाटे, ता. पूर्णा, जि. परभणी) असे मृत तरुणाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, बालाप्रसाद यांचे वडील संतोष सोनवळे यांच्या नावे देऊळगाव शिवारात गोदावरी नदीकाठी सुमारे तीन एकर शेती आहे. या शेतीवर त्यांनी संबंधित सहकारी संस्था तसेच ताडकळस येथील एसबीआय शाखेतून सुमारे तीन लाख रुपयांचे पीककर्ज घेतले होते. मागील काही वर्षांपासून हवामानातील अनिश्चितता आणि ओलाकोरडा दुष्काळ यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असल्याने उत्पन्नावर परिणाम झाला होता. शेतीची नापिकी, कर्जाची परतफेड कशी करायची आणि वृद्ध आई-वडिलांचा  सांभाळ  कसा करायचा, या चिंतेत  बालाप्रसाद असल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. शुक्रवारी (ता.१७) सायंकाळी साडेचारच्या सुमारास तो आपल्या शेताजवळ गोदावरी नदीकाठी गेला. त्यानंतर त्याने नदीपात्रात उडी घेतल्याचे परिसरातील शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. प्रवाह वेगवान असल्याने परिसरातील नागरिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र तो पाण्यात दिसेनासा झाला. घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील शिवाजी दुधाटे यांच्यासह गंगाखेड पोलिसांना देण्यात आली.माहिती मिळताच जमादार विजय चव्हाण, पोलीस कर्मचारी भारत पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पूर्णा नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. गणेश रापतवार, दीपक गवळी, सोनाजी खिल्लारे, तनवीर कुरेशी, नागेश खंदारे, अनिल बनसोडे, प्रकाश मकासरे आदी जवानांनी नदीपात्रात शोधमोहीम सुरू केली.        रात्रीच्या अंधारामुळे शोधकार्यात अडथळे निर्माण होत असल्याने शनिवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. अखेर तब्बल २० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बालाप्रसादचा मृतदेह त्याच्या शेतापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर पथकाच्या हाती लागला.दरम्यान, या घटनेप्रकरणी मृताचे वडील संतोष सोनवळे यांनी दिलेल्या खबरीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, धानोरा काळे येथे पाठविला आहे. पुढील तपास जमादार विजय चव्हाण करीत आहेत.

आनंदनगर फिडर ‘ओव्हरलोड’;गणेशोत्सवात पूर्णेकर अंधारात!

पाच दिवसांत  ३० ते ४०  वेळा वीज खंडित; डीपी जळणे, वाहिन्या तुटण्याच्या प्रकारांनी महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह पूर्णा, ता. १९ (प्रतिनिधी) : शहरातील भवानी माता मंदिर ३३ केव्ही उपकेंद्रातील आनंदनगर फिडरवर तांत्रिक दृष्ट्या … Read More

अवैध बायोडिझेल साठ्यावर राज्य दक्षता पथकाची छापेमारी!

मेहकर व दुसरबीड येथे एकाच वेळी धाड; ट्रक, भूमिगत टाक्या, डिस्पेन्सर युनिटसह २१ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त बुलढाणा, ता. ८ (प्रतिनिधी) : अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता … Read More

Farmer susaid; असोला येथील शेतक-याने लावला गळफास

ताडकळस/प्रतिनिधीअसोला येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. ७) उघडकीस आली.परभणी तालुक्यातील असोला येथील विश्वनाथ शिवरामजी जावळे (वय ७८)असे मयत शेतक-याचे नांव आहे. यावर्षी पाउस पडत नाही व सोयाबीनचे … Read More

आ.सईद खान यांच्या प्रयत्नांना यश;पाथरीच्या पाणीपुरवठा व भूमिगत ड्रेनेजसाठी ३३५ कोटींची मंजुरी

आमदार सईद खान नागरी सत्कार पाथरी/प्रतिनिधीपाथरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून प्रत्येक घरापर्यंत शुद्ध व मुबलक पाणी पोहोचले पाहिजे, यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. या पाठपुराव्याला यश आले … Read More

परभणी जिल्ह्यात कोरड्या दुष्काळाचे संकट गडद

दुष्काळ जाहीर करण्याची विविध पक्ष, संघटनांची मागणी परभणी/प्रतिनिधीपरभणी जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात पावसाचा मोठा खंड पडला आहे. परिणामी खरीप हंगामातील पिके पाण्याअभावी सुकून, करपून जात आहेत. मागील महिनाभरापासून पावसाने खंड दिल्याने … Read More

जिल्हा कचेरीवर धडकला आदिवासी विद्यार्थ्यांचा एल्गार मोर्चा

-राज्यपालांना पाठविले मागण्यांचे निवेदन परभणी/प्रतिनिधीराज्यभरातील आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांची शिक्षण, जात पडताळणी, वसतिगृह, शिष्यवृत्ती, रोजगार आणि मूलभूत शैक्षणिक सुविधांसाछी विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगत आदिवासी विकास विभागाच्या योजनांची … Read More

जिंतूरात सकल मातंग समाजाचा जनआक्रोश मोर्चा

-अनुसूचित जाती उपवर्गीकरणाची मागणी जिंतूर/प्रतिनिधीअनुसूचित जाती आरक्षणाचे ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ असे उपवर्गीकरण करून आरक्षणाचा लाभ सर्व घटकांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात मिळावा, या मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने मंगळवारी (दि. … Read More

ग्रामपंचायत अधिकारी युनियनचा जिल्हा परिषदेवर मुकमोर्चा

परभणी,ता.१(प्रतिनिधी): ग्रामसभेसंबंधी तरतूदीत सुधारणा करावी, ग्रामसभेसंबंधीच्या तरतूदीत आवश्यक त्या सुधारणा कराव्यात तसेच ग्रामपंचायत अधिकार्‍यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने पाऊले उचलावीत या मागणीकरीता या जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी युनियनने येथील जिल्हा परिषदे कार्यालयावर … Read More

बोरीत पोलीस व्यापारी संकुलाचे लोकार्पण

बोरी/प्रतिनिधीयेथील पोलीस प्रशासनाच्या व्यापारी संकुलाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या हस्ते मंगळवारी(दि. २५)सायंकाळी संपन्न झाले. या उद्घाटन सोहळ्यास अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, जिंतूर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल … Read More

You cannot copy content of this page