गंगाखेड मतदार संघात ४ जणांचे उमेदवारी अर्ज बाद
विधानसभा निवडणुक छानणी;२५ उमेदवारांचे ३३नामनिर्देशन पात्र
विशेष/ प्रतिनिधी (Gangakhed Assembly elections) : परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरलेल्या उमेदवारांच्या अर्जाची बुधवारी ३० रोजी छानणी प्रक्रीया पार पडली.२९ उमेदवारांपैकी ४ जणांचे उमेदवारी बाद झाली असून आता २५ उमेदवारांचे ३३ उमेदवारी अर्ज पात्र ठरले आहेत.
गंगाखेड मतदारसंघात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.प्रशासन निवडणूक प्रक्रिया राबवत आहे.२२ ते २९ ऑक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्ज विकत घेणे व अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.दरम्यान १११ उमेदवारी विक्री झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.२९ इच्छुकांनी ३८ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. बुधवार ३० ऑक्टोबर रोजी सहा.निवडणूक निर्णय अधिकारी जिवराज डापकर यांच्या नेतृत्वाखाली, गंगाखेड, पालम व पूर्णा तहसीलदारांनी छाननी प्रक्रिया राबवली.यामध्ये ब.स.पाचे उमेदवार शिवराज पैठणे यांचा तसेच विशाल बंडू कदम,राजकुमार बाबुराव राजभोज आणी संग्राम केशव रेंगे या दोन अपक्षांचे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे बालासाहेब हरिभाऊ निरस यांचा पक्षाचा एबी फाॅर्म नसल्याने एक उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आला आहे. महाविकास आघाडी शिवसेनेचे (ऊ.बा.ठा.) विशाल विजय कुमार कदम,मनसेचे रुपेश मनोहर देशमुख,वंचित बहुजन आघाडीचे माजी आ. सिताराम चिमाजी घनदाट मामा,महायुती पुरस्कृत रासपाचे उमेदवार विद्यमान आ. डॉ. रत्नाकर गुट्टे,जनहित लोकशाही पार्टीचे विठ्ठलराव जीवनाजी रबदडे,न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचे मदन रेनगडे,राष्ट्रीय मराठा पार्टीचे माधव सोपान शिंदे यांच्यासह अलका विठ्ठल साखरे, संजय साहेबराव कदम,स्मिता संजय कदम,जलील गुलाब पटेल,मुंजाजी नागोराव जोगदंड,नामदेव रामचंद्र गायकवाड,प्रविण गोविंदराव शिंदे, भगवान ज्ञानोबा सानप,विष्णुदास शिवाजी भोसले,लक्ष्मण शंकरराव शिंदे,विठ्ठल सोपान निरस,विशाल बबनराव कदम,विशाल बालाजीराव कदम, शिरीन बेगम मो.शफिक,शेख हबीब शेख रसूल,अँड.संजीव देवराव प्रधान व श्रीकांत दिगांबर भोसले या उमेदावारांचे ३३ अर्ज शिल्लक राहिले आहेत. गुरुवार ३१ ते ४ आॅक्टोंबर दरम्यान दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे.