परभणी प्रकरणातील दोषी पोलीसांना सक्तीच्या रजेवर पाठवा
मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांची सुचेना
परभणी(प्रतिनिधी)
येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तीकेच्या विटंबना प्रकरणानंतर उसळलेल्या हिंसाचाराच्या घटनेतील न्यायालयीन कोठडीत असलेले आंदोलनकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला.दरम्यान शांततेत चालू असलेले आंदोलन चिघळविण्यात आले असल्याचे निदर्शनास येते.प्रकरणा मागे कोणतीतरी शक्ती काम करत आहे.तेव्हा या घटनेमागची शक्ती कोणती आहे याची चौकशी करून दोषी पोलीस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या सूचना मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी १८ रोजी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मेश्राम बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे प्रभारी पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांची उपस्थिती होती.पुढे बोलताना मेश्राम म्हणाले,शांततेमध्ये चालू असलेले आंदोलन अचानक चिघळले आहे, असे समोर आले आहे.हे आंदोलन पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे चिघळले असल्याचे प्रत्यक्ष घटनाक्रमावरून लक्षात येते याघटनेमागे कोणती तरी शक्ती असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.ते तपासण्याचे काम प्रशासनाने लवकरात लवकर करावे. व्यापाऱ्यांची देखील नुकसान झालेले असल्यामुळे त्यांचे पंचनामे करून आयोगाला पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत.परभणीत घडलेली घटना ही दुर्दैवी घटना असून मनोविकृत माणसाने हे घडून आणले आहे. सामाजिक सलोखा व शांतता राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. घटनेची गांभीर्य पाहता चौकशी होईपर्यंत जे संबंधित तीन अधिकारी दोषीं असल्याचे सांगितले जात आहे.त्यांची चौकशी होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे असा सूचना दिल्याची माहिती समितीचे उपाध्यक्ष मेश्राम यांनी दिली आहे.