धनगर टाकळी येथील गोदापात्रात पार पडला दक्षिण कोरियातील विद्वत्त भिक्कूंचा उपसंपदा विधी
पूर्णा(प्रतिनिधी)
अखिल भारतीय भिक्कू संघांचे कार्याध्यक्ष भदन्त डॉ. उपगुप्त डॉ उपगुप्त महाथेरो यांच्या प्रमुख मार्ग दर्शना खाली 1फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता गोदावरी पात्रातील बेटा वर उपसंपदा विधी डॉ उपगुप्त महाथेरो यांनी उपसंपदा विधी पार पाडला.या प्रसंगी भदंत करुनाणंद महाथेरो, भदन्त प्रो. डॉ. एम. सत्यपाल महाथेरो डॉ इंद वंश महाथेरो भदंत पय्यारत्न महाथेरो भदन्त पय्यानंद थेरो भदन्त धम्म शील थेरो दक्षिण कोरिया येथील कोरियन बुद्धिस्ट विद्यापीठाचे कुलगुरू धम्मा मास्टर ली. ची. रॅन आदींची उपस्तिथी होती.
धनगर टाकळी येथील सरपंच मीराताई सैनाजी माठे उप सरपंच शेख मगदूम प्राचार्य डॉ गणेश जोशी भगवान पाटील सर पप्पु ढगे संपूर्ण गावकरी श्रद्धासंपन्न उपासक उपासिका यांनी भिक्कू संघांचेफटाक्याच्या अतिश बाजी मध्ये बँड लावून भिक्कू संघावर पुष्प वृष्टी करून स्वागत केले.श्रीकांत हिवाळे यांनी पूजनीय भिक्कू संघाचा परिचय करून दिला. व सूत्रसंचालन केले.