पुर्णा पोलिस प्रशासनाने घेतले दुचाकी चोरट्यास ताब्यात
पुर्णा पोलिस प्रशासनाने घेतले दुचाकी चोरट्यास ताब्यात
न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने सुनावली एक दिवसाची पोलिस कोठडी
पुर्णा (दि.२४ डिसेंबर) – पुर्णा पोलिस स्थानकात दाखल गुरनं. १७५/२०२० कलम ३७९ प्रकरणातील मोटार सायकल चोर रामेश्वर गव्हाणे राहणार धनगर टाकली यास आज गुरूवार दि.२४ डिसेंबर २०२० रोजी शेतातील आखाडा वरून उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष राठोड यांच्या मार्गर्दर्शनाखाली यशस्वी सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यास सन्माननीय न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने नमूद आरोपीस एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली असून या मोटार सायकल चोरट्यास यशस्वी सापळा रचून ताब्यात घेणाऱ्या पथकात पोहेकॉ.रणखांब,पोकॉ.समीर अख्तर पठाण,पोकॉ.चन्नावार,पोकॉ.समीर साबेर पठाण,पोकॉ.घोडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती…