महामानवांचे विचारच मानवतेचे खरे दिशादर्शक -आमदार संतोष बांगर
पूर्णा बुद्ध विहारात वर्षावास समारोप, चिवरदान व चैत्यभूमी पूजन सोहळा उत्साहात पार

पूर्णा ता.७ (प्रतिनिधी);“भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे जगासाठी तारणहार ठरले आहेत. त्यांनी मानवतेला समता, बंधुता आणि न्यायाचा मार्ग दाखवला. समाजापेक्षा माणूस मोठा आहे, हे शिकवणारे त्यांचे विचार आजही मार्गदर्शक आहेत. म्हणून प्रत्येकाने बुद्ध-डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा अंगीकार करून जीवनात परिवर्तन घडवावे,” असे प्रतिपादन कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केले.
अश्विन पौर्णिमेनिमित्त पूर्णा येथील बुद्ध विहारात वर्षावास समारोप, कठिण चिवरदान, संघदान, धम्मदेशना आणि स्मृतीशेष उपाली थेरो यांच्या चैत्यभूमी पूजनाचा कार्यक्रम मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने पार पडला.या कार्यक्रमाला भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, आमदार संतोष बांगर, प्रा. प्रदीप रोडे (बीड), डॉ. अनंत सूर्यवंशी (नांदेड), भिमराव सावदकर, भदंत पय्यावंश थेरो, भंते पंयाबोधी थेरो (खुर्गांव), भंते शिलरत्न थेरो, भंते रेवत बोधी थेरो, भंते सुमेध नागसेन (औसा), भंते पंयावंश, भंते पंयासार, भंते संघरत्न (देवगाव फाटा-जिंतूर)व भंते संघप्रिय यांसह मोठ्या संख्येने भिक्षू आणि अनुयायी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून झाली. त्यानंतर स्मृतीशेष उपाली थेरो यांच्या चैत्याचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी त्रिशरण, पंचशील व बुद्ध वंदना ग्रहण करून धम्ममार्गाचा संकल्प केला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.
आपल्या मनोगतात आमदार बांगर म्हणाले, “बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा आधार म्हणजे शांती, करुणा आणि सहजीवन. या विचारांवर चालणारा समाजच प्रगत आणि न्याय्य होतो. महिलांनी स्वावलंबी बनून घर आणि समाज दोन्ही उन्नत करावेत, मुलांना चांगले संस्कार द्यावेत आणि युवकांनी व्यसनमुक्त होऊन राष्ट्रनिर्मितीमध्ये सहभागी व्हावे. मी बुद्ध विहाराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन देतो.”
कार्यक्रमाला प्रकाश कांबळे, उत्तम खंदारे, ॲड. हर्षवर्धन गायकवाड, हाजी कुरेशी, ॲड. धम्मा जोंधळे, विरेश कसबे, सुनिल जाधव,मुकुंद पाटील,संदीप ढगे, मिलिंद कांबळे, कॉ.अशोक कांबळे, दिलीप गायकवाड, पी.जी.रणवीर,मिलिंद सोनकांबळे, संजय शिंदे, विजय सातोरे आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बोधीसत्व डॉ. बी.आर. आंबेडकर स्मारक समिती, बुद्ध विहार समिती, महिला मंडळ तसेच दिलीप गायकवाड, साहेबराव सोनवणे, राम भालेराव, किशोर ठाकरगे, गौतम सोनूले, बाळू बरबडीकर, राजू जोंधळे, त्र्यंबक कांबळे, अमृत कऱ्हाळे, अतूल गवळी, प्रशांत भालेराव यांनी परिश्रम घेतले.यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.