पोलिस कर्मचार्याच्या अंगावर टिप्पर घालुन जिवे मारण्याचा प्रयत्न…
पोलिस कर्मचार्याच्या अंगावर टिप्पर घालुन जिवे मारण्याचा प्रयत्न…
पुर्णा पोलिस स्थानकात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पूर्णा : अवैध वाळू वाहतूकीच्या टिप्परला थांबवण्याचा इशारा केल्यावर सदर वाहनचालकाने गाडी न थांबवता पोलिस कर्मचार्याच्या अंगावर वाहन टाकले. सुदैवाने यामध्ये पोलिस कर्मचारी वाचला. सदर प्रकरणी एकूण चार आरोपींविरोधात पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्णा शहर आणि तालुक्यातील नदीपात्रामधून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळूचा उपसा केला जात आहे. गुरुवार २५ मार्च रोजी पोलिसांचे पथक वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. मध्यरात्री एक च्या सुमारास पूर्णा शहरातील आयुर्वेदिक महाविद्यालय ते हाड्डी कारखाना या रोडवर वाळू घेऊन जात असलेल्या एका टिप्परला पोलिसांच्या पथकाने हात दाखवून थांबविण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाहनचालकोन त्याच्या ताब्यातील गाडी भरधाव वेगात चालवून जीवे मारण्याच्या उद्देशाने पोलिस कर्मचार्याच्या अंगावर टाकली. वेळीच कर्मचारी दिपक मुदीराज यांनी ताब्यातील मोटारसायकल बाजूला फेकून खाली पडल्याने त्यांचा जीव वाचला. मात्र पोलिस कर्मचार्याला मार लागला आहे. सदर प्रकरणी पोलिस कर्मचारी दिपक मुदीराज यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शेख बब्बर शेख बिबन, टिप्पर चालक, सुलेमान, समद या आरोपींविरोधात पूर्णा पोलिस ठाण्या गुन्हा दाखल झाला आहे. सपोनि. प्रविण धुमाळ तपास करत आहेत. घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी राठोड, सपोनि. चोरमले यांनी भेट देवून पाहणी केली.