पूर्णा येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त भव्य किर्तन सोहळा

पूर्णा ता.१४ (प्रतिनिधी): माणुसकी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, पूर्णा यांच्या वतीने ६९ वा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन व मास्टर अनिल कांबळे यांच्या अभिष्टचिंतन सोहळानिमित्त परिवर्तनवादी किर्तनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांच्या किर्तनाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम दि. १८ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ६ वा., बुद्ध विहार समोरील जिल्हा परिषद मैदान, पूर्णा येथे होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षपद डॉ. भंदत उपगुप्त महाथेरो (कार्याध्यक्ष, अखिल भारतीय भिक्खु संघ) भूषविणार असून, उद्घाटन मा.आ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते होईल. मा. मोहनराव मोरे स्वागताध्यक्ष तर मास्टर अनिल कांबळे प्रमुख आयोजक म्हणून कार्यरत आहेत.या प्रसंगी पुज्य भन्ते पय्यावंश (बुद्ध विहार, पूर्णा) मा.आ. डॉ. राहुल पाटील, मा.आ. राजेशदादा विटेकर, डॉ. सिध्दार्थभाऊ हत्तीअंबिरे, तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहतील. कार्यक्रमाला विविध मान्यवर, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक व युवा नेत्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त होणारा हा कीर्तन सोहळा बौद्ध धम्म, समता आणि सामाजिक परिवर्तनाचे विचार लोकांपर्यंत पोहोचविणारा ठरणार असून, या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मास्टर अनिल कांबळे ,राजकुमार सुर्यवंशी, मास्टर अनिल अहिरे, चंद्रमुनी लोखंडे,राहुल झोडपे, अनिल नरवाडे, भिमा आवटे, कुंदन ठाकुर, सीनू काळे, साकेत ऊर्फ सिनुभाऊ कांबळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.












