उद्या पासून जिल्ह्यात नविन नियमावली;जिल्हाधिकारी यांचा आदेश !
उद्या पासून जिल्ह्यात नविन नियमावली;जिल्हाधिकारी यांचा आदेश !
सकाळी 07:00 ते 11:00 पर्यंत सुट
बीड :
जिल्हाधिकारी यांचे नविन आदेश प्राप्त झाले असून उद्या पासून जिल्ह्यात अत्यावश्यक सेवांसाठी कमी वेळ देण्यात आलेला आहे.
आज जिल्हाधिकारी यांनी काढलेले नविन आदेशात किराणा दुकाने, भाजीपाला, फळविक्री, चिकन, मटन विक्रीची दुकाने, बेकरी या दुकानांना सकाळी सात ते 11:00 पर्यंत सुट दिली आहे. यासह केवळ हातगाड्यावर फिरुन फळांची विक्री सायंकाळी पाच ते सात पर्यंत विक्री करण्यात येणार आहे. या नियमांची अमलबजावणी ही उद्या पासून म्हणजे 19/4/2021 पासून लागू होणार आहेत.