भाजपच्या पूर्णा तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदाच्या निवडी जाहीर

Spread the love

तालुकाध्यक्षपदी संजय मोहिते व शहराध्यक्षपदी गोविंद उर्फ राज ठाकर यांची वर्णी

पूर्णा(प्रतिनिधी)

भारतीय जनता पक्षाने परभणी जिल्ह्यातील तालुका तसेच शहर अध्यक्ष जाहीर केले असुन पूर्णा तालुक्याच्या तालुका अध्यक्षपदी महागांव येथील भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते संजय मोहिते तर मनसेतुन भाजपमध्ये प्रवेश केलेले गोविंद उर्फ राज ठाकर यांची शहराध्यक्ष पदी निवड जाहीर केली आहे.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने परभणी जिल्ह्यातील गंगाखेड,पालम, पुर्णा, जिंतूर,सेलु,मानवत,परभणी, सोनपेठ येथिल तालुका व शहर मंडळा वरील तालुका अध्यक्ष व शहराध्यक्ष यांच्या निवडीची प्रक्रिया जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर( सामोरे), पक्षनिरीक्षक डॉ.सुभाष कदम,जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे,यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.पक्षाच्यावतीने नुतन पदाधिकारी निवडीचे पत्र जाहीर केले आहे.त्यात पूर्णा तालुका अध्यक्ष म्हणून महागांव येथील संजय मोहिते तर शहराध्यक्षपदी गोविंद उर्फ राज ठाकर यांची वर्णी लागली आहे. पूर्णा तालुका अध्यक्ष पदासाठी किसान मोर्चाचे बळीराम कदम,संजय मोहिते,राम चापके हे ईच्छुक होते तर शहराध्यक्ष पदासाठी माजी शहराध्यक्ष डॉ.अजय ठाकूर, सुनिल डुब्बेवार, मनसेतून नुकतेच भाजप प्रवेश घेतलेले गोविंद उर्फ राज ठाकर हे ईच्छुक होते.संजय मोहिते व राज ठाकर यांची वर्णी लागताच पूर्णा शहरासह तालुक्यात दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांनी नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष व शहराध्यक्ष यांना पक्ष वाढीसाठी भरिव कामगिरी करावी पक्ष पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी नव्या जोमाने कामाला लागावे असे आवाहन करत शुभेच्छा दिल्या आहेत.

You cannot copy content of this page