Breking News-परभणीत पंचायत समिती सभापतींच्या आरक्षणाची सोडत १० ऑक्टोबरला.!

Spread the love

परभणी ता.३० (प्रतिनिधी): Panchayat Samiti Election Reservation News;परभणी जिल्ह्यातील सर्व नऊ पंचायत समित्यांसाठी सभापती पदांची आरक्षण सोडत १० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पार पडणार आहे. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण (मा.प्र.से.) यांनी याबाबतची अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे.

आगामी पंचायत समिती निवडणूक अनुषंगाने यंदाच्या सोडतीत जिल्ह्यातील एकूण ९ सभापती पदांसाठी आरक्षणाचे विभाजन जाहीर करण्यात आले आहे. यात महिला आरक्षणाचा मोठा वाटा असल्याचे स्पष्ट होत असून, ग्रामीण भागातील महिलांच्या नेतृत्वाला चालना मिळणार आहे.सर्व इच्छुक नागरिकांनी व राजकीय कार्यकर्त्यांनी दिनांक १० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांची उस्तुकता

परभणी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेचा पुढील पाच वर्षांचा ताळेबंद या सोडतीतून ठरणार आहे. महिला सक्षमीकरणाला विशेष प्राधान्य मिळाल्याने अनेक नवे नेतृत्व उभारण्याची संधी.सर्व राजकीय पक्ष, कार्यकर्ते व नागरिक यांच्यात गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या नेत्यांत आपली जागा कशाला सुटेल याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

आरक्षणाचे स्वरूप

1️⃣ अनुसूचित जाती – ० 2️⃣ अनुसूचित जाती (महिला) – ०१ 3️⃣ अनुसूचित जमाती – ० 4️⃣ अनुसूचित जमाती (महिला) – ० 5️⃣ नागरिकांचा मागास प्रवर्ग – ०१ 6️⃣ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) – ०१ 7️⃣ सर्वसाधारण (महिला) – ०३ 8️⃣ सर्वसाधारण – ०३

You cannot copy content of this page