विश्वदीपच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पालीकेने त्याच्या आईस आर्थिक मदत व नौकरी द्यावी-बसपाची मागणी

Spread the love

बहुजन समाज पक्षाच्या वतीने निवेदन;आंदोलनाचा इशारा

पूर्णा ता.२९ (प्रतिनिधी);BSP Demand on Vishwadeep Kamble deth news शहरातील नालंदा नगरातील बौद्ध वस्तीत  १० वर्षीय विश्वदीप कांबळे याचा पालीकेने खोदलेल्या खड्ड्यात पडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.याप्रकरणी विश्वदीपच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पालीकेने त्याच्या आईस आर्थिक मदत व नौकरी द्यावी अशी मागणी बसपाच्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

पुर्णेतील नालंदा नगरात पालीकेच्या पाणी पुरवठा योजना अंतर्गत पाण्याची टाकी बांधकामासाठी एक भला मोठा खड्डा खोदून ठेवला आहे.या खड्डयात पडुन येथिल विश्वदीप कांबळे या १० वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली होती.पालीकेकडून काम करणाऱ्या ठेकेदाराने नियमबाह्य पद्धतीने साधारण २५ बाय ३० फूट एवढा मोठा खड्डा बाल उद्यान आणि सार्वजनिक ग्रंथालयासाठी राखीव असलेल्या जागेवर खोदला., त्या खड्ड्याभोवती कोणतीही सुरक्षितता भिंत किंवा कुंपण न घातल्याने हा अपघात घडल्याचे स्पष्ट झाले आहे.सदर खड्डा हा नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे मृत्यूचे कारण ठरल्याचा आरोप बसपाच्या वतीने करण्यात आला आहे.

“जागा सार्वजनिक उपक्रमांसाठी राखीव असूनही तिथे धोकादायक खड्डा खोदून सोडण्यात आलाच कसा..? मुलांच्या खेळण्याच्या जागेत संरक्षण भिंत न लावणे हे गंभीर दुर्लक्ष केले..?या दुर्घटनेनंतर मृतक संतोषच्या आईला तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी तसेच तिला पूर्णा नगर परिषदेत कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी, अशी मागणी बहुजन समाज पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी शुक्रवारी (ता.२९) रोजी नगर परिषदेकडे निवेदन देण्यात आले असून,”जर मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल. ,” असा इशारा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.निवेदनावर बसपाचे जेष्ठ नेते देवराव खंदारे, जिल्हाध्यक्ष युवराज सुर्यतळ,मा. नगरसेवक सुनील जाधव, धारबा गायकवाड, चंद्रकांत कांबळे, गौतम एंगडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

You cannot copy content of this page