अँड. हर्षवर्धन गायकवाड यांना राज्यस्तरीय सामाजिक सन्मान पुरस्कार
गुरु रविदास चॅरिटेबल ट्रस्ट व आदित्य सेवाभावी संस्था परभणी यांच्या वतीने पुरस्कार वितरण
पूर्णा, ता. २९ (प्रतिनिधी): येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक अँड हर्षवर्धन गायकवाड यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत गुरु रविदास चॅरिटेबल ट्रस्ट व आदित्य सेवाभावी संस्था परभणी यांच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय सामाजिक सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
परभणीत नुकतेच पार पडलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत अँड.गायकवाड यांचा पुरस्कार सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्याचा विविध स्तरावर गौरव करण्यात येत असून सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांनी केलेल्या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडत असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.सामाजिक न्याय, शैक्षणिक सहाय्य, वंचित घटकांसाठी न्याय मिळवून देणे तसेच सेवाभावी उपक्रम राबवून त्यांनी समाजात दिलेला मोलाचा हातभार हीच खरी त्यांची ओळख असल्याचे गौरवोद्गार काढण्यात आले.
पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना अँड. गायकवाड यांनी, "हा सन्मान माझ्या नव्हे तर समाजहितासाठी कार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे. समाज upliftment हीच माझी खरी प्रेरणा आहे," असे मत व्यक्त केले.पुरस्कार मिळाल्याबद्दल भदंत डॉ उपगुप्त महाथेरो,भंते पय्यावंश यांच्या सह प्रकाश दादा कांबळे, विशाल कदम,संतोष एकलारे,उत्तम भैय्या खंदारे, अँड राजेश भालेराव, अँड धम्मा जोंधळे, आदींनी अभिनंदन केले आहे.











