बसपाचा बेधडक मोर्चा पालीकेवर धडकला..

Spread the love

मागण्या मान्य न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

पूर्णा ता.२ जुन(प्रतिनिधी)

बहुजन समाज पार्टीच्या वतीने वाढीव मालमत्ता कराची दरवाढ रद्द करावी,रमाई घरकुल योजना,पाणी प्रश्न आदीं मागण्या घेऊन सोमवारी २ जुन पूर्णा नगरपरिषद कार्यालयावर जेष्ठ बसपा नेते देवराव खंदारे,मराठवाडा प्रभारी इंजि.अनिरुध्द रणवीर, जिल्हाध्यक्ष युवराज सुर्यतळ यांच्या नेतृत्वाखाली बेधडक मोर्चा काढण्यात आला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह येथून सोमवारी सकाळी ११ वा.मोर्चास सुरुवात करण्यात आली.मोर्चात जेष्ठ बसपा नेते देवराव खंदारे,मराठवाडा प्रभारी इंजि.अनिरुध्द रणवीर, जिल्हाध्यक्ष युवराज सुर्यतळ यांच्यासह भिमजी जोंधळे,धारबाजी गायकवाड,चंद्रकांत कांबळे,चैतानंद वाघमारे, प्रकाश खरे,हरीचंद मकासरेकृष्णा धुमाळे,शेख सलीम आदींसह शेकडो कार्यकर्ते नागरिकांची उपस्थिती होती.अवाजवी जाहीर केलेली घरपट्टी कमी करण्यात यावी. माता रमाई घरकुल योजना व प्रधानमंत्री आवास योजनांची हप्ते नियमित देण्यात यावी,महात्मा फुले नगर, डॉ. आंबेडकर नगर, सिद्धार्थ नगर, रमाबाई नगर, पंचशील नगर, विजय नगर येथे नळा‌द्वारे मिळणारे पाणी मुबलक व स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची नियोजन करावे. अकोला व नांदेड कडे जाणाऱ्या रेल्वे ओव्हर ब्रिज खालील रोड टी पॉइंट ते बोधी वृक्ष टी पॉइंट पर्यंत रोड तयार करणे, पूर्णा शहरांमध्ये घाणीमुळे पावसाच्या पाण्याने आरोग्य धोक्यात येण्याकारणाने मेन रोडवरील नाल्या व घनकचरा साफ करावा.अश्या मागण्यांचे निवेदन पालीकेस देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात नमूद केले आहे.

You cannot copy content of this page