चक्काजाम आंदोलनकर्त्यां २४ हुन अधिक शेतकऱ्यांसह, पुढाऱ्यांवर पूर्णा पोलीसांत गुन्हे दाखल

Spread the love

काहींना अटक करून नोटीसीवर सोडले

 पूर्णा,ता २५(प्रतिनिधी)

शेतकर्‍यांच्या कर्जमाफी सह,दिव्यांग, निराधारांच्या विविध मागण्यांसाठी  पूर्णा तालुक्यातील शेतकरी व सर्व पक्षीय राजकीय पुढाऱ्यांनी गुरुवारी (ता.२४) रोजीच्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलना अंतर्गत पूर्णा-ताडकळस टी-पाईन्ट महामार्ग क्रमांक -६१ रस्त्यावर रास्तारोको केला. प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात तब्बल २४ हुन अधिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     शेतक-यांना कर्जमाफी मिळावी, हमीभावासह दिव्यांग, निराधारांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने  मा.आ बच्चु कडुंनी गुरुवारी राज्यात चक्काजाम आंदोलनाचा ईशारा दिला होता.त्यात सर्वपक्षीयांना सहभागी होण्याची साद घातली होती. त्यानुसार पूर्णा येथे पूर्णा- ताडकळस रस्त्यावरील टिपाईन्ट येथे शेकडोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांसह शेतकऱ्यांनी सुमारे दिड ते दोन तास रस्ता रोखुन धरत शांततेत रास्तारोको आंदोलन केले होते. यावेळी शेतकर्‍यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.

         पोलीसांनी यावेळी काही आंदोलनकारांना ताब्यात घेऊन जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी आदेश धुडकावून बेकायदेशीर रित्या जमाव जमवून रास्तारोको करुन वाहतूकीस अडथळा निर्माण केल्याचे कारण देत फौजदार सोनेराव जाधव यांच्या  फिर्यादी वरून शिवहार सोनटक्के रा.पिंपरण, साहेबराव कल्याणकर रा. आनंद नगर पुर्णा,मोहम्मद शफीक मोहम्मद रफिक रा.पुर्णा,श्रीधर दगडु पारवे,प्रल्हाद आनंदराव पारवे मुंजाजी नागोराव जोगदंड, नरेश उध्दवराव जोगदंड, निळकंठ नामदेवराव जोगदंड,पुंडलीक नरहरी जोगदंड,शेषेराव विश्वनाथ पारवे,रा.सर्व गौर, वैजनाथ माधव लोखंडे रा. सातेफळ, प्रेम उर्फ ज्ञानेश्वर दिगांबर देसाइ रा.चुडावा अनिल उत्तमराव बुचाले रा.आव्हई, सैनाजी बाबाराव माटे रा धनगर टाकळी, माणिकराव सुर्यवंशी रा. निळा, गणेश धोंडीराम बुचाले रा. आव्हई, विठ्ठल जोगदंड रा.दस्तापुर, बालाजी वैद्य रा. कुंभारवाडी, गंगाधर काशिनाथ कदम रा. सोन्ना, तातेराव बाबुराव चव्हाण रा. सातेफळ, श्रीहरी पांडुरंग इंगोले रा.देगाव, गोविंद ग्यानोजी कदम रा. सोन्ना,ज्ञानोबा नरहरी किरगे रा. पिंपळगाव लिखा,‌प्रल्हाद कोंडीबा लोखंडे रा. सातेफळ व इतरांवर पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.तपास सपोनि गजानन पाटील हे करत आहे.

You cannot copy content of this page