रेल्वे बायपासला जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध सोमवार पासून साखळी उपोषण..!
रेल्वे प्रशासनाने प्रस्तावित केलेला चुडावा-मरसुळ बायपास;यापुर्वी मोजणीची रोखली होती.
पूर्णा ता.१८(प्रतिनिधी)
प्रस्तावित चुडावा-मरसुळ बायपासला तालुक्यातील आडगावं(ला),बरबडी,गौर शिवारातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देण्यास प्रखर विरोध सुरू केला असून, यापुर्वीही सबंधीत शेतक-यांनी जमीन मोजणीसाठी आलेल्या पथकास पिटाळून लावले होते.आता या शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भुमिका घेत ता.२१ जुलै सोमवार पासून पुर्णा तहसीलदार कार्यालयासमोर साखळी उपोषण करणार असल्याचा ईशारा दिला आहे.
रेल्वे मंत्रालयाने दमरे रेल्वेच्या नांदेड विभागातील पूर्णा-अकोला ते नांदेड-मनमाड लोहमार्गास जोडल्या जाणाऱ्या प्रस्तावीत चुडावा-मरसूळ बायपासला मंजुरी दिली असून,जमीन अधिग्रहण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. काही दिवसांपूर्वी प्रशासनाचे पथक परिसरातील जमीन मोजणीसाठी आले असता स्थानिक शेतकऱ्यांनी यास विरोध दर्शवित मोजणी रोखली होती.
या बायपास मध्ये सबंधीत शेतकऱ्यांच्या कायम उदर्निवाहाच्या जमीनी जाणार असल्याने या शेतकऱ्यांनी आपल्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवली आहे.२१ जुलै सोमवार रोजी पासून येथील तहसील कार्यालया समोर साखळी उपोषणास सुरुवात करण्यात येणार आहे.अशा आशयाचे निवेदन शुक्रवारी ता.१८ रोजी विठ्ठल भोरे,कैलाश ठाकरे,भाऊराव सोनवळे,मुंजाजी सोनवळे,बळीराम गौंड,यादवराव जाधव, पंचफुलाबाई भोरे, नवनाथ दवणे,चांदू पारवे,राजकुमार जोगदंड यांनी स्वाक्षरीने प्रशासनाला दिले आहे..












