परभणी ता.४ (प्रतिनिधी) -
परभणी येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, येथे अभिजात मराठी भाषा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या अनुषंगाने कार्यालयात ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्रा.डॉ.संजय कसाब, प्राध्यापक, मराठी विभाग स्वा.सै.सुर्यभानजी पवार महाविद्यालय,पूर्णा यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून ' अभिजात मराठी भाषा' या विषयावर डॉ संजय कसाब यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते .प्रा. कसाब सरांनी स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा इतिहास, मराठी भाषेचे महत्त्व, मराठी भाषेची विविधता आणि आपली संस्कृती व मराठी भाषा या विषयावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार परभणी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातील लिपीक सचिन गायकवाड यांनी केले.या कार्यक्रमासाठी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातील कर्मचारी व विद्यार्थी यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.