पत्रकार भवनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
पूर्णा (प्रतिनिधी)
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त येथील पत्रकार भवनात अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली.
जगभरात 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सबंध भारतवासी महामानवाची जयंती विविध माध्यमातून साजरी करत अभिवादन करत आहे.
पूर्णा शहरातील अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद शाखेच्या वतीने जयंतीदिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवर पत्रकारांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. यावेळी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मुजीब कुरेशी, गजानन हिवरे, दौलत भोसले, मोहम्मद अलीम, अनिस बाबुमिया, सुशील कुमार गायकवाड, गोपी मित्रे, सुशील कुमार दळवी सह अधिपत्रकार उपस्थित होते. यावेळी दौलत भोसले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन चरित्रावर उजाळा टाकला.












