परभणीत चोरट्यांनी अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय फोडले..!
सुमारे ५ लाखांचा मुद्देमाल लंपास;चोरट्यांचे पोलीसांना ओपन चॅलेंज.?
परभणी ता.१(प्रतिनिधी) येथील अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात चोरी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.३१) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञात चोरटयावर नवा मोंढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विभागाचे सहाय्यक आयुक्त आनंत चौधरी यांना शुक्रवारी कार्यालयातील एका कर्मचार्याने कार्यालयाच्या मुख्य द्वाराचे कुलूप तुटल्याची माहिती दिली. माहिती मिळताच सहाय्यक आयुक्त आनंत चौधरी यांनी कार्यालयात येऊन पाहणी केली. कार्यालयातून सीसीटीव्ही, डीआय, एचएचडी, सॉफटवेअर डिजाईन, वाईल्ड वेअर प्रोजक्टचे साहित्य तसेच सहाय्यक आयुक्त दालनातील काही साहित्य चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. कार्यालयातील एकूण ४ लाख ७८ हजार १०० रूपयाचा मुद्देमाल चोरीला गेल्याची तक्रार सहायक आयुक्त आनंत चौधरी यांनी नवा मोंढा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरटयांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरिक्षक कदम हे करीत आहेत.











