पवार महाविद्यालयात स्वच्छता अभियानाचे आयोजन
पूर्णा (प्रतिनिधी) – येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने (०८ ऑक्टोबर ) राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी आदर्श कॉलनी, पूर्णा येथील परिसरातील स्वच्छता अभियानात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. याप्रसंगी महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. भीमराव मानकरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. संजय कसाब, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. भारत चापके, महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. संक्षिप्त स्वरूपात बातमी बनवून द्या