Gangakhed Assembly;पूर्णेत एम.आय.एम पक्षाची महत्वपूर्ण बैठक संपन्न

Spread the love

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी..!
पूर्णा/प्रतिनिधी
Asembaly Election 2024;विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरू झाली आहे.यासाठी विविध राजकीय पक्षांनीही कंबर कसली असून,पक्ष पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकां घेऊन चाचपणी सुरू केली आहे.त्याच अनुषंगाने परभणी जिल्ह्यातील Gangakhedगंगाखेड विधानसभा मतदारसंघातील पूर्णेत एम.आय.एम पक्षाने विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी १९ ऑक्टोबर रोजी एक महत्वपूर्ण बैठक घेऊन निवडणुकीत उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
गंगाखेड मतदार संघातील पुर्णा येथे शनिवारी एमआयएम पक्षाचे विधानसभा अध्यक्ष शेख हबीब सर यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष सय्यद मुक्तार यांच्या निवासस्थानी एम.आय.एम पक्षाच्या पदाधिकाऱी कार्यकर्ते यांची एक तातडीची बैठक बोलवण्यात आली होती.याबैठकीत आगामी गंगाखेड विधानसभा निवडणुकी संदर्भात पक्षांने निवडणूक लढवण्यासह विविध विषयांवर चर्चा कारण्यात आली. यावेळी ऑल इंडिया मजलिस-ए- इत्तेहादुल मुस्लिमीनAMIM (एमआयएम) पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना विधानसभा अध्यक्ष शेख हबीब सर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक पक्ष ताकदीने लढवणार असल्याचे पक्षाचे नेते असवद्दीन ओवेसी, मा.खा.इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले आहे.गंगाखेड मतदार संघातही पक्ष आपला उमेदवार देणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कसुन कामाला लागावे असेही ते म्हणाले.या बैठकीस तालुका अध्यक्ष वाहेज भाई,स.इम्रान भाई,पूर्णा शहराध्यक्ष सय्यद मुक्तार,हबीब बागवान,मो. आखिल भाई,रोफ खुरेशी,मो.साजिद भाई तसेच अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

You cannot copy content of this page