गंगाखेड;लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची जयंती साजरी..

Spread the love

गंगाखेड (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या मातीतील एक असामान्य राजकीय व्यक्तिमत्व, संघर्षयोध्दा लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीर, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि फळ वाटप करण्यात आले होते.

    समाजातील गरीब, वंचित व उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांनी केलेला संघर्ष कायम प्रेरणादायी आहे असे या प्रसंगी बोलत असताना कार्यक्रमाचे आयोजक रामप्रभु मुंढे म्हणाले.या शिबीरात असंख्य कार्यकर्ते व नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला असून स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त आयोजक रामप्रभु मुंढे यांच्या कार्यालयासमोर दि.१२ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी 11 वाजता गंगाखेड येथे स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब यांना अभिवादन करून रक्तदान शिबीराला सुरूवात करण्यात आली होती. या रक्तदान शिबीरात 83 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

    “भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.”आपली गंगाखेड शहरातील गोदावरी नदी स्वच्छता अभियान सुरू करणारे श्री.राजेभाऊ देशमुख आणि त्यांच्या टीमचा सत्कार करण्यात आला.लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीर, वत्सल विठाई अस्थिव्यंग शाळेच्या विद्यार्थ्यांना फळ व शैक्षणिक साहित्याचे वाटप, आदि उपक्रम घेण्यात आले. या रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी श्री.जिवराज डापकर सर, माजी नगराध्यक्ष रामप्रभु मुंढे, ॲड.व्यंकटराव तांदळे, रवी जोशी, निवृती महाराज ईसादकर, श्रीराम मुंढे, रणधिरराजे भालेराव, मनोहर महाराज केंद्रे, बंडू ओझा, बालासाहेब पारवे, संतोष टोले, विनोदराव शिंदे, गोविंदराव रोडे, सुनील ठाकूर, प्रशांत फड, संजय भालेराव, जगन्नाथ आंधळे, लक्ष्मण लटपटे, संतोष गायकवाड, मनोज मुंडे, बालाजी कल्याणी, वाघमारे गणेशराव, दिनेश भेंडेकर, देवा यादव, नंदकिशोर बलोरे आप्पा, अजित जयस्वाल, भागवत जलाले, ओमकेश आंधळे, विठ्ठल शिंदे, राजू शेख, मुकरम शेख, निळे नळदकर, लखन कांबळे, संतोष हनवते, अविनाश मुंडे, यांच्यासह आदिंची उपस्थित होती.यावेळी रक्त केंद्र जिल्हा रूग्णालय परभणीचे डॉ.मनीषा राठोड मॅडम, श्री.आत्माराम जटाळे, श्री.संजय वाघमारे, श्री.विकास कांबळे, श्री.किशोर जाधव, श्री.मारोती श्रीसिरगजवार, श्री,शुभम अंभोरे श्री.शेख सलीम यांच्या सह आदिंनी शिबीरामध्ये परिक्षम घेतले

You cannot copy content of this page