गोदावरी नदीद ट्रक कोसळला;२ गंभीर जखमी

Spread the love

चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात; खळी-दुसलगाव परिसरातील दुर्घटना

परभणी/प्रतिनिधी

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने साड्यांनी भरलेला ट्रक थेट गोदावरी नदीच्या पात्रात कोसळल्याने चालक आणि अन्य एक असे दोघे जखमी जखमी झाले. ही घटना परभणी-गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर खळी-दुसलगाव परिसरात गुरूवारी (दि.6) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली.
धुळे येथून एम.एच.१८/७४२८ हा ट्रक लातूर जिल्ह्यातील उदगीरकडे जात असताना गंगाखेड तालुक्यातील खळी-दुसलगाव शिवारात गोदावरी नदीच्या पुलावरून चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अचानक गोदावरी नदीत आयशर पलटी झाला. हा आयशर साड्यांची वाहतूक करीत होता. घटनेची माहिती कळताच खळी येथील युवा कार्यकर्ते उत्तम पवार, रुग्णवाहिका चालक रावण भालेराव, दत्ता सोळंके यांनी गोदावरी नदीमध्ये उतरून ट्रकमधील दोघांना बाहेर काढले. जखमी झालेल्या दोघांनाही तात्काळ गंगाखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.जखमींनी दिलेल्या माहितीनुसार ते दोघे शोयब खान गफार खान वय ३० वर्ष जुबेर अब्दुल रहमान वय १८ वर्ष दोघे राहणार धुळे असं त्यांचे नाव आहे.कापड,साड्या घेऊन जात असताना ट्रकचा स्टेरींग राॅड तुटल्याने चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटले.पुलावरील नदीचे कठडे तोडून ट्रक नदीपात्रात पात्रात कोसळला.

You cannot copy content of this page