गंगाखेड;लोकशाहीच्या तिन्ही स्तंभांना वाळवी, चौथ्या स्तंभाला पुढे यावे लागेल-अशोक वानखेडे
•गंगाखेड येथे दर्पण दिन सोहळा थाटात संपन्न
•जिल्ह्यातील व्हॉईस ऑफ मीडिया सदस्यांचा झाला सन्मान
•संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांची उपस्थिती
उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे,व्हॉइस ऑफ मीडिया प्रदेश कार्याध्यक्ष विजय चोरडिया, जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
दरम्यान व्हॉईस ऑफ मीडिया गंगाखेड शाखेतील ४५ पत्रकार सदस्यांना प्रत्येकी १५ लाख रुपयांचे विमा कवच देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. शहरातील ज्येष्ठ पत्रकारांचाही यावेळी सन्मानचिन्ह देत सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये व्हॉइस ऑफ मीडिया नांदेड जिल्हाध्यक्ष गणेश जोशी यांनी संघटने मार्फत नांदेड येथे संघटनेतील पत्रकारांना घरकुल व विमा कवच देण्यासंदर्भात करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहीती दिली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी उपस्थित पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांला उत्तरे दिली. माझे माध्यम कोणते आहे हे विचारू नको, मी कोण आहे ते विचार असे ठामपणे सांगायला शिका म्हणत पत्रकारांनी जोड व्यवसाय करावा, ताण तणाव कमी ठेवावा, गरजा कमी कराव्यात, पत्रकारांत आत्मसन्मान असला पाहिजे, मन लावून न घाबरता काम करा असा सल्ला यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना दिला. कार्यक्रमाच्या निरोपिय भाषणात बोलताना संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी प्रत्येकाला मदत करा, मदतीची भावना ठेवा, संघटना आपल्या आजूबाजूला कार्यरत आहे, इतरांशी द्वेष भावना ठेवू नका, चाट जीपीटी व एन व्ही सारखे ॲपचा पत्रकारांनी वापर सुरू करावा, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे काळाची गरज असल्याने काळानुरूप चालायला सुरुवात करा असा सल्ला दिला. नांदेड येथे १५ व १६ फेब्रुवारी रोजी पत्रकारांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. त्या कार्यशाळेत पत्रकारांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी ९ तालुक्यातील व्हॉईस ऑफ मीडिया शाखेच्या तालुकाध्यक्ष व सदस्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा दर्डा यांनी तर आभार तालुकाध्यक्ष अन्वर शेख लिंबेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया गंगाखेड शाखेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.