श्री.गुरुबुद्धीस्वामींचा पालखी सोहळा व प्रसिद्ध खिरीचा महाप्रसाद

Spread the love

पूर्णा (प्रतिनिधी)

श्री गुरु बुद्धी स्वामी पाडवा यात्रा महोत्सवाची सांगता सोमवार ता.३१ मार्च रोजी होणार आहे. सोमवारी.श्रींच्या भव्य पालखी सोहळा व सुप्रसिद्ध खीर व हुलपल्लीच्या महाप्रसादाने होणार आहे.

पूर्णा येथील संत श्री गुरूबुध्दिस्वामी पाडवा यात्रा महोत्सवास ता.२२ मार्च शनिवार पासून प्रारंभ झाला होता.दरम्यान  अखंड शिवनाम सप्ताह, ग्रंथराज परमरहस्य पारायण व शिव महापुराण कथा सोहळा,पार पडला आहे . सोमवारी सकाळी श्रींचा महाभिषेक ,महाआरती, तदनंतर दु.१२ ते ६ खीर व हुलपल्लीचा महाप्रसाद व रात्री १० वा. भव्य पालखी सोहळा संपन्न होणार आहे.प्रसिद्ध खिर हुलपल्लीच्या महाप्रसाद बणवण्यासाठी पदाधिकारी भाविक तयारीला लागले आहेत.पालखी सोहळ्याकरीता पालखी रथ, श्रींचे तैलचित्र लावलेले रथ सजावट सुरू झाली आहे.परिसरातील भाविकांनी श्रींचा पालखी सोहळा व सुप्रसिद्ध खीर हुलपल्लीच्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा महोत्सव समीतीच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page