अज्ञात वाहनाच्या धडकेत ५४ वर्षीय शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू

Spread the love

पुर्णा तालुक्यातील एकरुखा शिवारातील घटना; वाहनचालक पसार;ताडकळस पोलिसांत गुन्हा दाखल

ताडकळस/प्रतिनिधी
पुर्णा – ताडकळस रस्त्यावर एकरुखा शिवारात अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने ५४ वर्षीय शेतकऱ्यांच्या मुत्यू झाल्याची घटना मागील ३० नोव्हेंबर रोजी घडली होती. या प्रकरणी रविवारी(दि. ७)ताडकळस पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, अज्ञात वाहन चालकाने ३० नोव्हेंबर रोजीचे रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास पुर्णा – ताडकळस रस्त्यावर एकरूखा शिवारात अण्णा काशिनाथ सदगर(वय ५४)रा. हटकरवाडी ता. पुर्णा हे शेतातुन घरी गावाकडे पायी येत असतांना अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात आण्णा सदगर यांना कपाळावर, नाकावर, चेहर-यावर, छातीवर, पोटावर, खरचटुन जखमा झाल्या तसेच उजवे पायाच्या गुडघ्यावर, घोट्यास, डाव्या पायाला, मांडीला, पींड्रीला मार लागुन गंभीर दुखापत झाली. त्यास प्राथमिक आरोग्या केंद्र ताडकळस दाखल केले असता तपासून डॉक्टरांनी मयत घोषित केले.

अज्ञात वाहनचालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवुन मुत्युसत कारणीभूत ठरल्याप्रकरणी साहेब काशिनाथ सदगर यांच्या फिर्यादीवरून ताडकळस पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास ताडकळसचे ठाणेदार गजानन मोरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस सहायक पोलिस उपनिरिक्षक नामदेव सुजलोड हे करीत आहेत.

                                     ________

You cannot copy content of this page