Hi-tech Residency School;झिरोफाटा खूनाप्रकरणातील मुजोर संस्थाचालक दाम्पत्य जेरबंद..!
परभणी पोलीसांची पुण्यात कारवाई;प्रभाकर चव्हाण व रत्नमाला चव्हाण दाम्पत्याला घेतलं ताब्याची सुत्रांची माहिती
पूर्णा ता.२२(प्रतिनिधी)तालुक्यातील एरंडेश्वर शिवारातील हायटेक रेसिडेन्सी शाळेत घडलेल्या किर्तनकार जगन्नाथ महाराज हेंडगें खुन प्रकरणात पोलिसांना झुगारा देणारे (Hi-tech Residency School Zirophata) मुजोर संस्थाचालक चव्हाण दाम्पत्यास परभणी पोलीसांच्या टिमने,पुण्यातून ताब्यात घेत (ता.२१) रोजी रात्री जेरबंद केल्याची खात्री लायक माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
पूर्णा तालुक्यातील झिरोफाटा परिसरात असलेल्या हायटेक निवासी शाळेत (Hi-tech Residency School) आपल्या पाल्याची टिसी आणण्यासाठी गेलेल्या किर्तनकार हभप.जगन्नाथ महाराज हेंडगे वय(४२) या.उखळद ता.परभणी यांना (ता.१०) जुलै संस्थाचालक चव्हाण दाम्पत्यानी बेदम मारहाण केली होती.घटनेत हेंडगे महाराज यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. याप्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात गुरन२९८/२०२५ कलम१०३(१), ११५(२),३५२,३(५) भा.न्या.संहीता कायद्यानुसार प्रभाकर चव्हाण व त्याची पत्नी रत्नमाला चव्हाण यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणाचे संबंध जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले होते.याप्रकरणी परभणीत जनाक्रोश मोर्चा झाला होता.तसेच आ.डॉ राहुल पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती.खा.संजय जाधव यांनी देखील याप्रकरणी शासनाकडे तक्रार दाखल केली होती.भाजप , राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ,काँग्रेस सह अन्य पक्षांनीही निषेध व्यक्त केला होता. प्रकरण घडल्यानंतर संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्याची पत्नी रत्नमाला चव्हाण हे पसार झाले होते.पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ समाधान पाटील, यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही आरोपी दाम्पत्याची लुक आउट नोटीस जारी केली होती. परभणी पोलिसांच्या ९ टीम याकामी लावल्या होत्या.जनतेतील रोष वाढत होता.चव्हाण दाम्पत्य मात्र मागील १० दिवसांपासून पोलीसांना गुंगारा देत होते.अखेर परभणी पोलिसांच्या एका टिमला या जोडीचा सुगावा लागला. पोलीसांनी त्यांना सोमवारी सांय पुणे परिसरातून ताब्यात घेऊन जेरबंद केले आहे.अशी माहिती सुत्रांकडून मिळालेली आहे. अधिक माहितीसाठी वाचा महा समाचार न्युज….