होम मिनिस्टर स्पर्धेत मानकरी ठरल्या बबीता सोनकांबळे, वैशाली सोनकांबळे व मीना हातागळे

Spread the love

पुर्णेत मा.नगरसेवक सुनिल जाधव व साईछत्र, दुर्गामाता नवरात्र आयोजित होम मिनिस्टर स्पर्धा संपन्न

पूर्णा ता.३(प्रतिनिधी) येथिल मा.नगरसेवक तथा टायगर ग्रुपचे सुनीलदादा जाधव यांनी पंचशील नगर येथील श्री. साई छत्र नवरात्र महोत्सव समिती व श्री दुर्गामाता नवरात्र महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य होम मिनिस्टर स्पर्धा (ता .१) बुधवारी येथिल रेल्वे इन्स्टिट्यूट येथे उत्साहात पार पडला.यास्पर्धेत सोन्याची नथ व पैठणी साडी बबीता सोनकांबळे यांनी तर चांदीचे नाणे व पैठणी वैशाली सोनकांबळे यांनी व मानाची पैठणी मीना हातागळे यांनी पटाकवल्या आहेत.

पुर्णा येथे बुधवारी रात्री नांदेड येथील सुप्रसिद्ध यशराज शिंदे व श्रद्धा शिंदे यांचा होम मिनिस्टर कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला अध्यक्ष रेल्वे रिटायर असोसिएशनचे अध्यक्ष अशोक कांबळे तर प्रमुख पाहुणे रिपाई नेते प्रकाशदादा कांबळे, पत्रकार जगदीश जोगदंड (सकाळ), बंडूदादा गायकवाड (संस्थापक, पंचशील नाट्य ग्रुप), सुरेश हाटकर, लक्ष्मण शिंदे, पत्रकार मोहन लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते. हरिनगर, पंचशील नगर, रेल्वे कॉलनी परिसरातील महिलांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वांनीच गाणी, प्रश्नमंजुषा, नृत्य, मनोरंजन, खेळ, उखाणे अशा विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन‌ यशराज शिंदे यांनी करून रंगत वाढवली.

अंतिम फेरीसाठी १४ महिला स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. यामध्ये कोमल खर्गखराटे, बबीता सोनकांबळे, पूजा निकाळजे, सुनिता मोरे, रूपाली बुधे, सुजाता कांबळे, मीना हातागळे, प्रियंका मोदीराज, निकिता मलदोडे, वैशाली सोनकांबळे, प्रतिभा झिझाडे, वर्षा कांबळे, सोनाली जाधव व दिव्या वाघमारे या सहभागी झाल्या होत्या.त्यामध्येअंतिम फेरीत प्रथम क्रमांक – सौ. बबीता सोनकांबळे (सोन्याची नथ व पैठणी साडी पुरस्कार)द्वितीय क्रमांक – वैशाली सोनकांबळे (चांदीचे नाणे व पैठणी साडी)तृतीय क्रमांक – मीना हातागळे (मानाची पैठणी) पटवली.

विशेष म्हणजे, अंतिम फेरीत पोहोचलेल्या सर्व महिलांना आयोजक सुनील लक्ष्मण जाधव व अनिता सुनील जाधव यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष धीरज संग्रेल, सचिव रोहित संग्रेल, तसेच हरी ओम राठोड, कुणाल गुप्ते, विकास मुदीराज, शिवम राठोड, बबलू जाधव, उमेश जाधव, सुरेश बगाटे, सुरेंद्र पटेकर, सुरज जाधव, करण माने, ताराचंद माने आदींनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन प्रा. डॉ. महेश जाधव यांनी केले.

You cannot copy content of this page