संस्थाचालक दाम्पत्याच्या पोलीस कोठडीतील मुक्काम ३ दिवसांनी वाढला
झिरोफाटा (पूर्णा)हायटेक निवासी शाळेतील हभपं.हेंडगें महाराज खुन प्रकरण;मा.पूर्णा न्यायालयाचा निर्णय
पूर्णा ता.२५(प्रतिनिधी)परभणी जिल्ह्यातील पूर्णेतील झिरोफाटा येथील हायटेक निवासी शाळेत घडलेल्या हभप.जगन्नाथ महाराज खुन प्रकरणांत पूर्णा पोलिसांच्या कोठडीत असलेले शाळेचे संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्याची पत्नी रत्नमाला चव्हाण यांच्या पोलीस कोठडी ३ दिवसांनी वाढवली आहे. याप्रकरणी शुक्रवारी (ता.२५) रोजी मा.पूर्णा न्यायालयात सुनावणी पार पडली . यामुळे संस्थाचालक चव्हाण दाम्पत्याचा पोलीस कोठडीतील मुक्काम आणखीन वाढला आहे.

परभणी तालुक्यातील उखळद येथिल हभप.जगन्नाथ पांडुरंग हेंडगे हे आपल्या मुलीची टि.सी.काढण्यासाठी (ता.१०) रोजी झिरो फाटा येथील हायटेक रेसिडेन्शीयल शाळेत गेले होते. दरम्यान या ठिकाणी संस्थाचालक प्रभाकर चव्हाण, व त्याच्या पत्नीने प्रवेशावेळीची उर्वरित रक्कम भरून घेण्यासाठी जबर मारहाण केली.यात जगन्नाथ महाराज हेंडगे यांचा मृत्यू झाला होता.या प्रकरणी पूर्णा पोलीसांत खुनाचा गुन्हा दाखल आला होता.या घटनेनंतर तब्बल १२ ते १३ दिवस चव्हाण दांम्पत्य फरार झाले होते. दरम्यान आरोपींच्या अटकेसाठी मोर्चा देखील काढण्यात आला. पोलीसअधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी स्वतः जातीचे या प्रकरणात लक्ष घातले.आरोपींच्या शोधासाठी १० पथकं नेमली.या पथकाने चव्हाण दाम्पत्याला पुणे येथून ताब्यात घेत अटक केली होती. दरम्यान मंगळवारी (ता.२२) रोजी या.पूर्णा न्यायालया समोर हजर केले होते. मा.न्यायालयाने चव्हाण दाम्पत्यास (ता.२५) रोजी पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली होती.पोलीसांनी या प्रकरणी कमालीची गोपनीयता बाळगली आहे. शुक्रवारी पोलीसांनी पुन्हा एकदा या दोघांना पूर्णेत मा.न्यायालयासमोर हजर केले असता मा.न्यायालयाने या प्रकरणी संस्थाचालक चव्हाण दाम्पत्याला आणखीन सोमवार (ता.२८) रोजी पर्यंत ३ दिवसांची पोलीस कोठडी वाढवून दिली आहे.यामुळे पोलीसांना आणखीन सखोलपणे तपास करता येणार आहे.तर चव्हाण दाम्पत्याला आणखीन काही दिवस पोलीस कोठडीत मुक्कामी रहावे लागणार आहे.पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ समाधान पाटील हे करत आहेत.