नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक;पूर्णेत बुधवारी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम..!

Spread the love

मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुठ्ठे यांची माहिती

पूर्णा ता.६(प्रतिनिधी);पूर्णा नगरपरिषदेच्या सन २०२५ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) तसेच सर्वसाधारण महिला या गटांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरीता नगरपरिषद प्रशासनाने सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.या सोडतीचा कार्यक्रम बुधवार, दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २.३० वाजता पार पडणार आहे. सोडतीचे ठिकाण म्हणून गोंधळी सम्राट राजारामबापू सभागृह, जुना मोंढा, पूर्णा निश्चित करण्यात आले आहे. या सोडतीनंतर आरक्षण जाहीर करण्याची अधिकृत तारीख गुरुवार, ९ ऑक्टोबर २०२५ अशी ठरविण्यात आली आहे.दरम्यान, आरक्षणासंदर्भात हरकती व सूचना नोंदविण्यासाठी इच्छुक नागरिकांना ९ ऑक्टोबरपासून १४ ऑक्टोबर २०२५ पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. या कालावधीत दुपारी ३.०० वाजेपर्यंत नागरिक आपले अर्ज मुख्याधिकारी, नगर परिषद पूर्णा यांच्या निवडणूक कार्यालयात अथवा नगरपरिषदेच्या कार्यालयात दाखल करू शकतात.हरकती व सूचना दाखल करणाऱ्या नागरिकांना आवश्यक असल्यास सुनावणीसाठी स्वतंत्रपणे कळविण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.या कार्यक्रमाची माहिती मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांनी अधिकृत सूचनेद्वारे प्रसिद्ध केली आहे.

You cannot copy content of this page