महाविर जयंती;पूर्णेत भगवान महाविरांच्या तैलचित्राची शोभायात्रा

Spread the love

पूर्णा (प्रतिनिधी)

भगवान महावीर जयंती निमित्त येथील सकल जैन समाज बांधव व जैन श्वेतांबर संघाच्या वतीने भगवान महावीरांच्या तैलचित्राची भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती.शोभायात्रेत जैन व राजस्थानी बंधू-भगिनींनी सह विविध धर्मिय नागरिक सहभागी झाले होते.

पूर्णा शहरातील प्रमुख मार्गावरून सजवलेल्या रथातून भगवान महाविरांच्या तैलचित्राची शोभायात्रा काढण्यात आली.या शोभा यात्रेचे विसर्जन जैन मंदिर येथे झाले. यावेळी मेवाड चंद्रीका शासन सूर्या साध्वी जयश्रीजी महाराज सा, राजश्री महाराज सा, समिक्षा महाराज सा यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. यावेळी जगदीश जोगदंड, ॲड. शिवप्रसाद सोनी, राजेश धूत यांनी विचार मांडले. प्रमुख उपस्थितात डॉ. प्रेमचंद सोनी, शांतीलाल मुथा, नवलचंद मुथा, किशोर लोडाया, प्रफुल्ल खिवंसरा, उत्तमचंद मुथा, प्रेमचंद मुथा, रामगोपाल अग्रवाल, अशोक अग्रवाल,प्रभुदयाल ओझा,दिपक मुथा, प्रेमचंद खिवंसरा, शाम दायमा,आकाश मालपाणी,जिगर लोढाया, राम सोनी,विजय अग्रवाल, सुरेश सैन, आदी मान्यवरांसह महावीर जन्मकल्याणक समितीचे अध्यक्ष मनोज लापसिया, उपाध्यक्ष अतुल तातेड, तेजस मुथा, कोषाध्यक्ष मयूर खिलोसिया, महावीर लोढा आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रमोद मुथा यांनी केले. अमोल सोनटक्के यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page