मनोहर अंतरकर सरांचे निधन
पूर्णा( प्रतिनिधी)
येथिल लोककल्याण नागरी सहकारी पतसंस्था म. पूर्णाचे माजी उपाध्यक्ष ,आदर्श काॅलनी येथील रहिवासी तथा रा. स्व.संघाचे जेष्ठ स्वयं सेवक श्री मनोहर अंतरकर सर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.मृत्युसमयी त्यांचे वय ८५ वर्ष होतेसोमवारी ता.१० मार्च रोजी दु. ३ वाजता छ. संभाजीनगर येथे निधन झाले आहे.त्यांची अंत्यविधी प्रताप नगर, स्मशानभूमी ,उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर येथे सोमवारी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास होणार आहेत्यांच्या पश्चात मुले,मुली, नातवंडे सुना असा मोठा परिवार आहे.ते फार्मसिस्ट मंगेश अंतरकर यांचे वडील होत.