मारोती कदम यांना ‘ आचार्य अत्रे साहित्य गौरव पुरस्कार
पूर्णा(प्रतिनिधी)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव येथील उपक्रमशील शिक्षक मारोती भुजंगराव कदम यांना साहित्य क्षेत्रात अल्पावधीत केलेल्या लक्षवेधी साहित्यिक योगदानाची नोंद घेवून काव्यमित्र संस्था , पुणे मार्फत दिला जाणारा आचार्य अत्रे साहित्य गौरव पुरस्कार जाहिर केला आहे . असे काव्य मित्र संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र सगर यांनी कळवले आहे . सदर पुरस्कार पुणे येथे हेणाऱ्या आचार्य अत्रे स्मृतिदिन समारंभात प्रदान करण्यात येणार आहे .
मारोती कदम यांनी आजतागयत फोर्थ अंपायर (वैचारिक लेख संग्रह ) वक्ता ते प्रवक्ता , वंचितांचा मुक्तिदाता – डॉ बाबासाहेब आंबेडकर , बहुजनांचा दीपस्तंभ – डॉ . बाबासाहेब आंबेडकर , प्रज्ञांकुर (भीमजयंती विशेषांक ) संघनायक -भदंत पय्याबोधी इत्यादी संदर्भ साहित्य प्रकाशित झाले असून मास्तर आवगो रे आणि महाएल्गार ( प्रातिनिधिक कविता संग्रह ) प्रकाशनाच्या वाटेवर आहे . गेल्या पंचविस वर्षापासून सातत्याने अग्रगण्य दैनिकांतून शैक्षणिक , साहित्यिक, सामाजिक प्रश्नांवर विपूल प्रमाणात स्तंभलेखक म्हणून दिशादर्शक लेखन केल्याची दखल घेऊन यापूर्वी देखील त्यांना स्मृतिशेष बबन जोगदंड सम्राट भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .
सदर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी बालाजी कापसीकर , मुख्याध्यापक विठ्ठल रिठे , केंद्रप्रमुख उमाकांत देशटवार, आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत .