Jansuraksha Bill जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात परळीत भव्य निदर्शने

Spread the love

विधेयक रद्द करण्याची एकमुखी मागणी

परळी(वै)ता.२१(प्रतिनिधी).

(Repeal of Jan Suraksha Bill)राज्य शासनाने भारतीय राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या मुलभूत अधिकारावर गदा आणणारे ‘जनसुरक्षा विधेयक’नुकतेच पारीत केलं आहे.हे विध्येयक रद्द करण्यात यावे यामागणी साठी परळीत जनसुरक्षा विधेयक विरोधी कृती समितीच्या वतीने सोमवार ता.२१ जुलै रोजी भव्य निदर्शने केली.तसेच राज्यपालांनी या विधेयकावर स्वाक्षरी न करता ते रद्द करावे अशा आशयाचे निवेदन परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या मार्फत राज्यपालांना देण्यात आले.

जनसुरक्षा कायदा रद्द करा

महाराष्ट्र सरकारने नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे जनसुरक्षा विधेयक पारित केले आहे. या कायद्याच्या विरोधात परळीत जनसुरक्षा कायदा विरोधी कृती समितीच्या वतीने सोमवार मोंढा मार्केट येथे दुपारी भव्य निदर्शने करण्यात आली. तसेच यावेळी जनसुरक्षा विधेयक रदद करावे, राज्य सरकारचा जाहीर निषेध, संविधान वाचवा देश वाचवा आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादुर भाई, कम्युनिस्ट पक्षाचे नेते अजय बुरांडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड प्रकाश मुंडे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे, काँग्रेसचे नेते वसंतराव मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष बाबा शिंदे, शिवसेनेचे तालुका प्रमुख भोजराज पालीवाल, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष श्रीकांत पाथरकर, जेष्ठ नेते उत्तम माने, संभाजी ब्रिगेडचे सेवकराम जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे देवराव लुगडे महाराज, सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक रानबा गायकवाड, कॉ पांडुरंग राठोड, पत्रकार भगवान साकसमुद्रे, विद्यार्थी आघाडीचे सय्यद उमेर आदिंनी या विधेयकाच्या विरोधात आपले विचार मांडले. राज्य सरकारने आणलेला जनसुरक्षा हा कायदा सर्वसामान्य नागरिकांना भारतीय राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकार आणि व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणार असल्याचे वक्त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी शिक्षक नेते पी.एस.घाडगे, जगन्नाथ सोळंके, विठ्ठलराव झिलमेवाड, भगवान बडे, दता दहिवाळ, धम्मानंद क्षीरसागर, गौतम साळवे, ज्ञानेश्वर मुंडे, बालासाहेब गिते, प्रकाश वाघमारे, सय्यद जाबेर, अहेमद सय्यद, सय्यद फेरोज, यशवंत सोनवणे, दिपक सिरसाठ, मदन वाघमारे, शंकर शेजुळ, जावेद शेख, रंजना खरात, सुभाष सावंत, बाबासाहेब रोडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते , सामाजिक कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page