पूर्णेचे मिलिंद कांबळे समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

Spread the love
पुर्णा या.४(प्रतिनिधी) येथील रहिवासी तथा परभणी जिल्हा पोलिस खात्यात कार्यरत असलेले कर्मचारी मिलिंद कांबळे यांना नुकतेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जालना येथील आयोजित कार्यक्रमात समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.जालना येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवा साहीत्यरत्न फेस्टीवल २०२५ चे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात विविध क्षेत्रात, समाजीक कार्यात अग्रेसर भुमिका बजावणा-या व्यक्तींना समाज भुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.परभणी पोलीस दलात सेवा बजावणारे पूर्णा येथील रहिवासी मिलींद कांबळे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर आ. अर्जुनराव खोतकर, मा. नगराध्यक्ष भास्करराव आंबेकर, सुनीलबापू, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ.सचदेव, अरविंद देशमुख, बसपा जिल्हाध्यक्ष भाई सुधाकर निकाळजे यांची उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.

You cannot copy content of this page