कराड परिवारचा सत्कार म्हणजे माहेरची अनुभती -पालकमंत्री मेघना साकोरे(बोर्डीकर)
पूर्णा(प्रतिनिधी)
येथिल कराड परिवारातील बंधुतुल्य विनय व विजयसह काका- काकूंचे वहींनींचे माझ्यावर असलेले प्रेम, जिव्हाळा ,आत्मीयता यामुळे मी जेंव्हा जेंव्हा पुर्णेत त्यांच्या घरी येते त्यावेळी मला माझ्या माहेरी आल्याची अनुभुती मिळते असे आप्तेवाईक उद्गार परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे( बोर्डीकर) यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्याच्या ऊर्जा, आरोग्य,सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा नुकतीच परभणी जिल्हा पालकमंत्री म्हणून निवड झालेल्या ना. मेघना साकोरे (बोर्डीकर) शुक्रवारी ता.३१ जानेवारी रोजी पूर्णा तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या यावेळी त्यांनी भाजपाचे माजी प्रदेश कार्यकारणी सदस्य वाल्मिक अण्णा कराड जिल्हा संयोजक विजय कराड, प्रदेश सचिव विनय कराड, यांच्या निवासस्थानी मंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर प्रथमच भेट दिली. यावेळी संपूर्ण कराड परिवारा तर्फे त्यांचा माहेरवाशिणी प्रमाणे साडीचोळी देऊन यथोचित स्वागत व सत्कार करण्यात आला.प्रसंगी त्यांनी कराड कुटुंबीयांसह मनमुराद गप्पा मारल्या.यावेळी वाल्मिक अण्णा कराड,सौ.इंद्रायणी कराड,भाजपा जिल्हा संयोजक विजय कराड, प्रदेश सचिव विनय कराड, सौ.वैष्णवी कराड, सौ.रोहिणी कराड सह संपुर्ण कराड कुटुंबीय उपस्थित होते.