Parbhani Police दलात मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन,५ आय-बाईकची दाखल
पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन
परभणी, दि. १७ (प्रतिनिधी) :Parbhani Police Force Newsपरभणी पोलीस विभागाच्या कामकाजासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आणि पाच आय-बाईकची आजपासून भर पडली. या साधनांचे उद्घाटन पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री बोर्डीकर म्हणाल्या की, परभणी पोलीस विभागाने केलेलाMobile Forensic Van, 5 I-bikes registered in आय-बाईकसारखा उपक्रम कौतुकास्पद आहे. “टाकाऊ पासून टिकाऊ” या संकल्पनेतून या बाईक तयार झाल्या असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांचा उपयोग होईल. त्यांनी या उपक्रमाचे मुख्यमंत्री यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमात उदाहरण म्हणून सादरीकरण करण्याची सूचना केली.
पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी सांगितले की, फॉरेन्सिक व्हॅन आणि आय-बाईकच्या मदतीने तपासाची गती वाढेल.यावेळी पालकमंत्री यांनी आय-बाईकला हिरवी झेंडी दाखवली. तसेच या साधनांचे प्रशिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.












