रेल्वेपुलावर ३५ वर्षीय तरुणाचा निर्घुण खुन

Spread the love

वसमत शहरातील घटना; तीघांवर गुन्हा दाखल

हिंगोली/ प्रतिनिधी

धारधार शस्त्राने डोक्यात तसेच पाठीवर गंभीर घाव घालून एका ३५ वर्षीय तरुणाचा निर्घुण खुन केल्याची घटना हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरातील परभणी रस्त्यावरील रेल्वे पुलावर घडल्याचे उघडकीस आले असून, जून्या वादातून सदरील तरुणाचा खून करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती आहे.युवकाची ओळख पोलीसांनी पटवली असुन याप्रकरणी वसमत पोलीसांत तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चांदू सुग्रीव जाधव (३५) रा.हयातनगर ता.वसमत जि.हिंगोली असं त्या खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे.वसमत ते परभणी मार्गावर रेल्वे पुलावर १९ मे रोजी रात्रीच्या सुमारास एक तरूण गंभीर अवस्थेमध्ये जमखी असल्याची माहिती वसमत शहर पोलिसांना मिळाल्याने पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन युवकाला वसमत उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. सदरील मयताची माहिती पोलिसांनी काढली असता वसमत तालुक्यातील हयातनगर येथील चांदू सुग्रीव जाधव (३५) हा असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याबाबतची माहिती वसमत शहर पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना दिल्यानंतर ते रुग्णालयात धाऊन आले. चांदू याच्या डोक्याच्या पाठीमागील बाजूस कशाने तरी वार करून त्याचा खुन केला असल्याचे स्पष्ट झाले. यावरून २० मे रोजी वसमत शहर पोलिसात राम सुग्रीव जाधव याने दिलेल्या फिर्यादीवरून रामा येरडकर, अनिल गुंजाळे रा. पुर्णा कारखाना रोड वसमत, ओमा माने रा. हयातनगर ता.वसमत या तिघा विरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा खुन जून्या वादातून झाला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे. या गुन्ह्यातील तिन्ही आरोपी फरार असल्याने जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वसमत शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, सहाय्यक पोलिस निरीक्षक शेकडे, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, गजानन भोपे, साहेबराव कसबेवाड, शेख हकीम, जमादार प्रशांत मुंढे यांच्या पथकाने शोध मोहीम सुरू केली आहे.

You cannot copy content of this page