पुर्णेत शुक्रवारी’होम मिनिस्टर’ सोन्याची नथ, पैठणी जिंकण्याची संधी-मा.नगरसेवक सुनिल जाधव

Spread the love

“नवरात्र उत्सवात” खास महीलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

पूर्णा ता.२५(प्रतिनिधी) – नवरात्र म्हणजे भक्ती, आनंद आणि उत्साहाचा पर्व. याच पार्श्वभूमीवर हरिनगर ,पंचशील नगर, पूर्णा येथे भागातील तरुण तडफदार माजी नगरसेवक सुनील जाधव यांनी महिलांसाठी खास सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन केले आहे. महाराष्ट्रभर लोकप्रिय ठरलेला सुप्रसिद्ध निवेदक युवराज थिरे व श्रद्धा थिरे यांनी मांडणी केलेला. ‘होम मिनिस्टर” कार्यक्रम” शुक्रवार, दि. २६ सप्टेंबर २०२५ रोजी सायं. ४.३० वाजता रंगणार आहे.तरी शहरातील महीला भगीनींनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

महिलांसाठी मनोरंजनाचा महोत्सव

कार्यक्रमात ओळ पेहचानची, धरलं वहिनीचं, मराठी–हिंदी गाणी, प्रश्नमंजुषा, झटपट खेळ, उखाणे, भावगीत* अशा अनेक स्पर्धा होणार असून महिलांना आपली कला सादर करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

आकर्षक पारितोषिके

  • प्रथम पारितोषिक – सोन्याची नथ व पैठणी साडी
  • द्वितीय पारितोषिक – चांदीचे नाणे व पैठणी साडी
  • तृतीय पारितोषिक – मानाची पैठणी

याशिवाय सहभागींना दिलखेचक बक्षिसांचीही रेलचेल असणार आहे.या उपक्रमाचे आयोजन नगरसेवक सुनिल दादा जाधव यांनी केले आहे. त्यांनी सांगितले, “नवरात्र हा स्त्रीशक्तीचा उत्सव आहे. महिलांना एकत्र आणून त्यांना कला-गुणांना वाव मिळावा म्हणून हा उपक्रम राबविला आहे. भक्तीबरोबरच मनोरंजनाचा रंगतदार माहोल महिलांना अनुभवता येईल.” हरिनगर,पंचशील नगरात या कार्यक्रमास महीलांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

👉 कार्यक्रम स्थळ: पंचशील नगर, पूर्णा 👉 दिनांक व वेळ: शुक्रवार, २६ सप्टेंबर २०२५, सायं. ४.३० वा.

You cannot copy content of this page