राष्ट्रवादी काँग्रेस(श.प) पक्षाच्या पुर्णा शहराध्यक्षपदी शेख करीम

Spread the love

पूर्णा ता.१३(प्रतिनिधी)राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षाच्या पुर्णा शहर अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शेख करीम यांची निवड करण्यात आली आहे.नुकतेच जिल्हा अध्यक्ष मा.आ.विजय गव्हाणे यांनी निवडीचे पत्र दिले आहे.

     राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या आदेशाने परभणी जिल्ह्यातील पदाधिका-यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.यावेळी पुर्णा तालुका अध्यक्षपदी येथिल अशोकराव बोकारे यांची तर शहराध्यक्षपदी शेख करीम शेख शादुल्ला यांची निवड जाहीर केली आहे.परभणी जिल्हा कार्यालयात मंगळवारी (ता.१२) ऑगस्ट रोजी जिल्हाध्यक्ष मा.आ.अँड. गव्हाणे यांनी शेख करीम यांना पक्ष कार्याची जबाबदारी सोपवली आहे. यावेळी मा.नगरसेवक मेहबूबसाब कुरेशी,मुसा कुरेशी,ताजोद्दीन बाशा, मिलींद खरे,बंडु घाटोळ सय्यद हानीफ, महेबुब, इस्माईल कुरेशी ,शेख मुस्तफा,शेख मुस्ताक ,रफीक बागवान आदींची उपस्थिती होती.शेख करीम यांच्या निवडीचे पुर्णा शहरात स्वागत होत आहे.

You cannot copy content of this page