उद्या बारावीचा निकाल जाहीर होणार

Spread the love

उद्या बारावीचा निकाल जाहीर होणार

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी हे निकालाची वाट सतत पाहत होते. आता नुकताच बोर्डाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. बारावीचा निकाल उद्या जाहीर केला जाईल. ऑनलाईन पद्धतीने २१ फेब्रुवारीला आपला निकाल विद्यार्थी पाहू शकणार आहेत. दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे. राज्यामध्ये 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 यादरम्यान बारावीच्या परीक्षा या पार पडल्या होत्या. यंदा राज्यामध्ये तब्बल 14 लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.

You cannot copy content of this page