बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका!

Spread the love

बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका!
मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिकाऱ्यांना मागणी – डॉ.गणेश ढवळे
बीड / प्रतिनिधी
मान्सून कालावधीत पुर अथवा वादळांमुळे नैसर्गिक आपत्ती येण्याची दाट शक्यता असते या परिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून आधिका-यांच्या बैठका घेण्याचा सपाटा लावत संबंधित कार्यालयात २४ तास नियंत्रण कक्ष सुरू करते मात्र बीड शहरातील बिंदुसरा नदीपात्रातील फ्लड झोन (पुर नियंत्रण रेषा) मध्ये सुरु असलेल्या अनाधिकृत बांधकाम आणि नदीपात्रातील उगवलेल्या बाभळीमुळे नदीपात्रात अरूंद झाले असुन झाडांना पाणी आडुन शहरात शिरण्याची दाट शक्यता असुन बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका असुन त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे त्यामुळे एकंदरीत आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठका नेहमीप्रमाणेच वांझोट्या ठरणार आहेत.त्यामुळे संबंधित प्रकरणात तातडीने उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ डॉ.गणेश ढवळे, शेख युनुस, सुदाम तांदळे , शिवशर्मा शेलार , रामनाथ खोड यांनी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, प्रधान सचिव, विभागीय आयुक्त यांना केली आहे.

भुमाफियांच्या पाठीशी नगरपरिषद प्रशासन ; नदीपात्रात अनाधिकृत बांधकाम!
बीड शहरातील बिंदुसरा नदीपात्रातील पुर नियंत्रण क्षेत्रातील भुमाफियांकडुन करण्यात आलेल्या व सुरू असलेल्या अनाधिकृत बांधकामाकडे नगरपरिषद अधिकारी आणि कर्मचारी जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत असुन बीड शहरातील नदी नाले,ओढे यांच्यावर राजकीय पुढारी, कार्यकर्ते, मुख्याधिकारी नगरपरीषद बीड, नगररचनाकार,भुमिअभिलेख, जलसंपदा विभाग कार्यालय यांनी संगनमतानेच भुमाफियांशी आर्थिक लाभातुन हातमिळवणी केली आहे.बीड शहरातील नदी,नाले,ओढे यांचे सर्व्हेक्षण करणे गरजेचे आहे.सव्हेक्षण नसल्याने रेडफ्लर्ड लाईन व ब्लूलाईन हा पट्टा ठरविण्यात आला नसल्याने नगरपरिषद प्रशासन याचा गैरफायदा घेत असुन अतिक्रमित बांधकाम प्रकरणी कंत्राटदार व जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.

बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना पुराचा धोका , वित्तहानी व जिवितहानीची शक्यता ; आपत्ती व्यवस्थापनाच्या वांझोट्या बैठका
महापुर येण्यास पुरक्षेत्रातील अतिक्रमणे, अवैध बांधकाम कारणीभूत असुन त्यामुळे पुरबाधित क्षेत्र असलेल्या ब्लु आणि रेड झोनमध्ये बांधकामांना परवानगी देण्यात येऊ नये असे मुख्यमंत्री यांचे स्पष्ट आदेश असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. १९८९ साली अतिवृष्टीमुळे शहरातील अनेक भागात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक व जिवितहानी झाली होती आणि २०१४ आणि २०२१ साली झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरात पुर सदृश स्थिती निर्माण झाली होती. मोठ्या प्रमाणात नागरीकांना याचा फटका बसला होता. शहरातील विविध भागांमध्ये पाणी शिरल्याने शहरवासीयांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते. बिंदुसरा नदीपात्रा शेजारील राहणाऱ्या तब्बल ३०० घरांना महापुराचा धोका असुन नगरपालिकेकडुन कोणतीही उपाययोजना करण्यात येत नाही. यापुर्वीही अशा दुर्घटना घडुन वित्तहानी व जिवितहानी झालेली असुन शहरातील मोमीनपुरा, खासबाग,जुना मोंढा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, पेठ बीड भागातील लोकांची पुर आल्यानंतर तारांबळ उडते. त्यामुळे तातडीने उपाययोजना करण्यात यावी.

नदीपात्रातील बाभळबनामुळे पाणी शहरात शिरण्याची शक्यता झाडांची साफसफाई आवश्यक!
बिंदुसरा नदीपात्रात मोठमोठी बाभळीची झाडे उगवली आहेत.त्यामुळे नदीचे पात्र अरूंद व अस्वच्छ झाले आहे.या झाडांना पाणी अडुन पाणी शहरात घुसण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे तातडीने साफसफाई करण्याची आवश्यकता आहे.
बिंदुसरा नदीपात्राचा डंपिंग ग्राउंड म्हणून वापर, नदीपात्रातील जैविक कचरा आरोग्यास घातक
शहरातील आसपासच्या भागातील कचरा,घाण पाणी तसे रूग्णालयातील घातक कचरा उचलुन बिंदुसरा नदीपात्रात टाकला जात असल्याने नदीचे पात्र अरूंद होण्याबरोबरच नागरीकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असुन रूग्णालयातील जैविक घातक कच-यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे संबंधित प्रकरणात दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे.

You cannot copy content of this page