Police red नांदेड जिल्ह्यातील गुटखा तस्कर पालम पोलिसांच्या जाळ्यात;गुटख्यासह दिड लाखंचा मुद्देमाल जप्त
पालम ता.19(प्रतिनिधी) ;Palam Police Station Newsपालम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बनवस ते चाटोरी रोडवर बनवस शिवारात अवैध गुटखा विक्री वर कारवाई करत 1 लाख 51 हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी पालम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बनवस-चाटोरी रस्ता परिसरात अवैध गुटखा वाहतुक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून पोलीस उपनिरीक्षक शिवकांत नागरगोजे, बळवंते, शिंगणवाड यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या कारवाईत सुदर्शन विठ्ठल पाटील रा. माळेगाव ता. लोहा याच्याकडून शनिवारी (दि.16) 07.45 वाजता बनवस ते चाटोरी रोडवर बनवस शिवारात अवैध गुटखा, पान मसाला चोरी करण्याच्या उद्देशाने बाळगुळ वाहतुक करीत असतांना मिळून आला. यावेळी आरोपीकडून केसरयुक्त विमल पान मसाला, तंबाखू आदी अवैध मुद्देमाल आढळून आला. ज्याची एकूण किंमत 1 लाख 51 हजार 200 रूपये एवढी आहे. तसेच एमएच13 एक्यु 0421 या वाहनातून देखील मुद्देमाल जप्त करण्यात आला.या विषयी पालम पोलिसात पोलीस कर्मचारी बाबु गंगाधर शिंगनवाड यांच्या फिर्यादीवरून विविध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पालमचे ठाणेदार खटाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवकांत नागरगोजे हे पुढील तपास करीत आहेत.












