परळी हादरली.! १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर निर्घृण अत्याचार; पोलीसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह.!
शहरातील बरकत नगर भागातील घटना; संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल;दोघे ताब्यात,दोघे फरार
परळी ता.९(प्रतिनिधी) :Parali Crime Newsशहर पुन्हा एकदा थरकाप उडवणाऱ्या घटनेने हादरले आहे. केवळ बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर निर्घृण Rape अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सात सप्टेंबरच्या रात्री घडलेल्या या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने तक्रार दाखल करताच नऊ सप्टेंबरच्या पहाटे संभाजीनगर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपींपैकी दोन अल्पवयीन विधी संघर्ष गस्त बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सात सप्टेंबर रोजी रात्री दुकानावरून घरी परतत असताना तिचा पाठलाग करणाऱ्या १५ व १६ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांनी तिचा हात धरून पानंदच्या अंधाऱ्या ठिकाणी खेचले. त्यानंतर त्यांनी तिच्यावर अत्याचार केला. यावेळी त्यांचे इतर दोन साथीदार उपस्थित होते. त्यांनी पीडितेला धमकावत मुख्य आरोपींना मदत केली, असे फिर्यादीत स्पष्ट करण्यात आले आहे.
पोलिसांची धावपळ…. पीडितेच्या आईने आठ सप्टेंबरच्या रात्री तक्रार दिल्यानंतर नऊ सप्टेंबर रोजी पहाटेच गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी हे अल्पवयीन असल्याने त्यांच्यावर **विधी संघर्ष गस्त बालक म्हणून कारवाई** करण्यात आली आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले असून उर्वरित दोघा फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी पाहणी
घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे, संभाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय ढोणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल शिंदे तसेच अंबाजोगाई पिंक पथकाचे एपीआय संतोष जाधवर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करून पुढील तपासाला गती देण्यात आली आहे.
पलळीत संतापाचा उद्रेक. परळी शहरात अवघ्या दहा दिवसांपूर्वी रेल्वे स्थानक परिसरात एका चिमुरडीवर अत्याचाराची घटना घडली होती. त्यानंतर शहरातील दुसऱ्या भागात केवळ बारा वर्षांच्या मुलीवर झालेल्या अमानुष घटनेमुळे नागरिक संतप्त झाले आहेत. शहरात प्रचंड संतापाचे वातावरण असून **कडक कारवाई व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी**, अशी मागणी जनतेकडून जोर धरू लागली आहे.
पोलिसांची निष्क्रियता…?
• आठ दिवसांत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार. • शहरात गस्त, नियंत्रणाचा पूर्ण अभाव. • गुन्हेगारीला आळा बसविण्यात पोलिस यंत्रणा सपशेल अपयशी. • महिलांच्या सुरक्षेच्या नावाखाली फक्त बैठका. पोलिसांचे निष्क्रियपण, दुर्लक्ष आणि ढिसाळ यंत्रणा यामुळेच परळी शहर गुन्हेगारीचे केंद्रबिंदू बनत चालले आहे. आज अल्पवयीन मुलींवर अत्याचार, उद्या आणखी गंभीर गुन्हा – हा नागरिकांचा थेट सवाल आहे. “शहरात कायदा सुव्यवस्था उरली आहे का.?नाही ” असा सवाल प्रत्येकाच्या ओठांवर आहे.











