परळी पोलीस शहर वाहतूकेचे श्रीकांत राठोड यांचे निधन..

Spread the love

परळी ता.१७ (प्रतिनिधी)परळी शहर पोलिस ठाण्यातील वाहतूक शाखेत कार्यरत पोलिस कर्मचारी श्रीकांत छोटूराम राठोड (वय ३८) यांचे रक्ताच्या कर्करोगाने दुर्दैवी निधन झाले. १७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

बीड तालुक्यातील अंतरवन पिंपरी तांडा येथील रहिवासी असलेले राठोड गेल्या दोन वर्षांपासून परळी शहर पोलिस ठाण्यात वाहतूक शाखेत कार्यरत होते. मनमिळाऊ स्वभाव, कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची शैली यामुळे ते सहकारी व नागरिकांत लोकप्रिय होते. काही महिन्यांपासून ते रक्ताच्या कर्करोगाशी झुंज देत होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी आणि दोन मुले असा परिवार आहे. अंतरवन पिंपरी तांडा येथील स्मशानभूमीत संध्याकाळी ६ वाजता शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.श्रीकांत राठोड यांच्या निधनाने पोलिस खात्यासह कुटुंबीय, मित्रपरिवार व परिचितांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, अल्पावधीत झालेला हा चटका लावणारा अंत सर्वांना अस्वस्थ करून गेला आहे.

You cannot copy content of this page