Parali Vaijanthयुनिक क्यूरियस किड्स शाळेत आगळीवेगळी दहीहंडी; चॉकलेट नव्हे.!शिक्षणाचा गोडवा.!
परळी ता.१६(प्रतिनिधी)येथिल ‘युनिक क्यूरियस किड्स’(unique qurius kids parali vaijanth) शाळेत मध्ये यंदा जन्माष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केलेल्या दहीहंडीत द्वारे विद्यार्थ्यांना केवळ गोड पदार्थ,चॉकलेट नव्हे,.! तर शिक्षणात देखील गोडवा.! वाढावा यासाठी प्रोत्साहीत करण्यात आले.

परळी शहरातील ‘युनिक क्यूरियस किड्स’ शाळेत प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दहीहंडीचे(Janmastami festival)आयोजन करण्यात आले होते.मात्र यावेळची दहीहंडी एक वेगळाच संदेश देऊन गेली.पारंपरिक गोड पदार्थ, चॉकलेट्स किंवा खेळणी यासोबतच, हंडीत भरले होते शालेय वस्तू,पेन्सिली, पेन,खोडरबर,रंगीत पेन्सिली आणि इतर शैक्षणिक साहित्य.लहान गोविंदा आणि गोपाळांनी कृष्णवेश परिधान करून, गाण्यांच्या तालावर, उत्साहाने मानवी पिरॅमिड रचला. वरच्या छोट्या गोविंदाने हंडी फोडताच शालेय वस्तूंचा वर्षाव झाला. मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आश्चर्याची लहर उमटली.हा आगळावेगळा उपक्रम केवळ उत्सवाचा आनंद देणारा नव्हता, तर विद्यार्थ्यांना त्यांच्या नवीन अभ्यासक्रमासाठी प्रोत्साहन देणारा ठरला. शिक्षणाची गोडी लावणारी आणि सांस्कृतिक परंपरांचे महत्त्व सांगणारी ही दहीहंडी पालक, उपस्थित पाहुण्यांनीही कौतुकाने गौरवली.प्रत्येक वयोगटातील विद्यार्थ्यानी कृष्ण जन्माची वेगवेगळ्या नाटिका ही सादर केल्या.













