Parbhani उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेची जोरदार तयारी
२९ सप्टेंबरला उपमुख्यमंत्री स्टेडिअम मैदानावर करणार जनतेला संबोधित
परभणी, दि.२२ (प्रतिनिधी): राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे सोमवार, २९ सप्टेंबर रोजी परभणी दौर्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत शहरातील स्टेडिअम मैदानावर भव्य जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी शिवसेनेतर्फे जोरदार तयारी सुरू असून, जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी (ता.२१) शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात नियोजन बैठक पार पडली. या बैठकीला माजी खासदार सुरेशराव जाधव, भास्करराव लंगोटे, राजू कापसे, जिल्हाप्रमुख विशाल कदम, नाना टाकळकर, बाळासाहेब पानपट्टे, महिला जिल्हाप्रमुख गीताताई सुर्यवंशी, तालुकाप्रमुख प्रभाकर कदम, प्रल्हादराव होगे, युवासेना जिल्हाप्रमुख आप्पाराव वावरे, नीरज ठाकुर, विनोदराव लोहगावकर, शेख शब्बीर, केशवराव कदम, पप्पु काका जाधव, पप्पु वाघमारे यांच्यासह जिल्ह्यातील विविध पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी या प्रसंगी मार्गदर्शन करताना सांगितले की, “उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या परभणी दौर्यामुळे जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांना गती मिळेल. कार्यकर्त्यांनी एकजुटीने या जाहीर सभेला भव्य स्वरूप द्यावे,” अशी अपेक्षा व्यक्त केली.शिवसेनेच्या या तयारीमुळे परभणीत २९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कार्यकर्त्यांनी जिल्हाभरातून उत्साहात सहभाग नोंदवला असून, शिंदे यांच्या भाषणातून परभणी जिल्ह्याला कोणती नवी विकास दिशा मिळणार, याकडे जनतेचे लक्ष केंद्रीत झाले आहे.












