आ. डॉ. राहुल पाटील यांनी दिव्यांगासोबत साजरी केली आनंदाची दिवाळी!

Spread the love

फराळ, कपडे, खेळणी, शैक्षणिक साहित्य वाटप; समाजातील संवेदनशीलतेचा दिला अनोखा संदेश

परभणी (प्रतिनिधी):
आमदार डॉ. राहुल पाटील यांनी यंदाची दिवाळी एक वेगळ्या पद्धतीने साजरी केली. परभणी एमआयडीसी परिसरातील दिव्यांग शाळेत त्यांनी दिव्यांग बांधवांसमवेत आनंदाची दिवाळी साजरी करत सामाजिक संवेदनशीलतेचा संदेश दिला.

आमदार डॉ. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांची मालिका राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात दिव्यांग बांधवांना फराळाचे साहित्य, नवीन कपडे, खेळणी आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर डॉ. विवेक नावंदर, ज्ञानेश्वर पवार, बाळराजे तळेकर, नवनीत पाचपोर, संभानाथ काळे, उद्धव मोहिते, अजित यादव, बंडू बिडकर, प्रकाश जाधव यांची उपस्थिती लाभली.यावेळी आमदार डॉ. पाटील म्हणाले, “दिव्यांग बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्याचा अनुभव मनाला आनंद देणारा आहे. समाजातील दुर्बल घटकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे हीच खरी दिवाळी.” ते पुढे म्हणाले, “दिव्यांगांच्या प्रश्नांवर आम्ही सातत्याने काम करत आहोत. याआधीही परभणीत दिव्यांगांना कृत्रिम हात-पाय, ट्रायसायकल वाटप करण्यात आले असून, भविष्यातही अशा उपक्रमांची मालिका सुरू राहील.”कार्यक्रमाचे आयोजन अजय चव्हाण, विष्णू वैरागड, विलास राठोड, सुभाष मोरे, ऋतेश लासे, ज्ञानेश्वर राठोड, महेंद्र फुटाणे, भोसले यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.या अनोख्या दिवाळी सोहळ्याने परभणीतील सामाजिक कार्याला नवी दिशा देत, ‘आनंद वाटण्यातच खरी दिवाळी असते’ असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

You cannot copy content of this page