स्व.डॉ.सुनंदा मंत्रीच्या मुलांनी पुर्ण केली मरणोत्तर देहदानाची ईच्छा
परभणी वैद्यकीय महाविद्यालयातील पार पडले पहीले देहदान;चळवळ गतीमान होणे काळाची गरज जिल्हा शल्य चिकित्सक -डॉ.नागेश लखमावार
परभणी( प्रतिनिधी):
शहरातील पहिल्या महिला डॉक्टर स्व.डॉ.सुनंदा मंत्री यांनी संकल्प केलेली मरणोत्तर देहदानाची ईच्छा त्यांच्या मुलांनी पुर्ण केली आहे.
परभणी येथिल जुन्या पिढीतील जेष्ठ महीला डॉक्टर डॉ.सुनंदा मंत्री यांचं वार्धक्याने रविवार १५ डिसेंबर रोजी वयाच्या ९६व्या वर्षी निधन झाले.मृत्यु पच्छात माझ्या मृतदेहाचे अंतिम संस्कार न करता तो मेडिकल कॉलेजला शिकणार्या मुलांच्या शिक्षणासाठी उपलब्ध करून द्यावा असा देहदानाचा संकल्प त्यांनी सोडला होता.त्या़ची अखेरची ईच्छा त्यांच्या मुलांनी कुटूंबियांनी पुर्ण केली आहे.आईची अंतिम इच्छा पूर्ण करण्याच्या हेतुने त्यांचा मुलगा संजय मंत्री यांनी केला. यावेळी सिव्हिल हॉस्पिटलचे डॉ. किशोर सुरवसे, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागेश लखमावार, डॉ.रामेश्वर नाईक, डॉ. बाहुबली लिंबळकर, डॉ. विवेक नावंदर आणि मेडिकल कॉलेजचा स्टाफ असलेला चंद्रकांत कवठेकर, डॉ. प्रज्ञा यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात होणार्या पहिल्या वाहिल्या देहाचे स्वागत करुन देह स्वीकारला.यावेळी बोलताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ लखमवार म्हणाले की, परभणीतील वैद्यकीय महाविद्यालयात पहीले देहदान पार पडले.देहदानाची चळवळ जिल्ह्यात उभारली पाहिजेत विनोद डावरे यांनी देहदानाची चळवळ उभी केली आहे. मात्र अजून व्यापक प्रमाणात देहदानाची जनजागृती होणे आवश्यक आहे.